Header AD

रेझिंग डे सप्ताह निमित्त भिवंडीत पोलीस बँड पथकाने वाजविल्या देशभक्तीपर गीतांच्या सुरवटी




भिवंडी ,  प्रतिनिधी  :  एक जानेवारी पोलीस स्थापना दिवस या निमित्त प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यातील पहिला सप्ताह रेझिंग डे सप्ताह म्हणून साजरा केला जात असून या मध्ये विविध कार्यक्रमांचे आटोजन करून समाजात चांगला संदेश देण्याचे काम पोलीस दला कडून होत असते .त्याचाच एक भाग म्हणून पोलीस बँड पथकातील जवान देशभक्तीपर गीतांच्या सुमधुर सुरवटी चौकाचौकात वाजवून संदेश देत आहेत .


ठाणे पोलीस आयुक्तालयातील बँड पथक प्रमुख सहाय्यक पो उप निरीक्षक शामराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील पोलीस बँड पथकाच्या वादन कार्यक्रमाचे भिवंडी शहरातील धामणकर नाका येथे शहर पोलीस ठाणे व भोईवाडा पोलीस ठाणे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते .याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे, शंकर शंकर इंदलकर, पोलीस निरीक्षक नरेंद्र पवार, अजय कांबळे ,पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.ज्याचा अस्वाद घेण्यासाठी नागरीक ही काही काळ त्या ठिकाणी थबकले होते.
रेझिंग डे सप्ताह निमित्त भिवंडीत पोलीस बँड पथकाने वाजविल्या देशभक्तीपर गीतांच्या सुरवटी रेझिंग डे सप्ताह निमित्त भिवंडीत पोलीस बँड पथकाने वाजविल्या देशभक्तीपर गीतांच्या सुरवटी Reviewed by News1 Marathi on January 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

गरिबीचे नाटक करून लग्न करून ती करायची नवाऱ्यांची फसवणूक , भिवंडीत झाला प्रकार उघड

■फसवणूक करणाऱ्या तीन महिलांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.... भिवंडी दि. १५ (प्रतिनिधी  )  फसवणुकीचा अनेक घटना आपल्या आजूबाजूला नेहमी...

Post AD

home ads