Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ५९ हजारांचा टप्पा


◆१०६ नवे रुग्णसलग साहव्या दिवशी एकही मृत्यू नाही ५९,०६६ एकूण रुग्ण तर १११८ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत १३१ रुग्णांना डिस्चार्ज...



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ५९ हजारांचा टप्पा ओलांडला असून

आज नव्या १०६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज सलग साहव्यादिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. गेल्या २४ तासांत १३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

    

       आजच्या या १३१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५९,०६६ झाली आहे. यामध्ये १०७५ रुग्ण उपचार घेत असून ५,८७३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १११८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १०६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१६कल्याण प -३३, डोंबिवली पूर्व २८डोंबिवली प – १८, तर  मांडा टिटवाळा येथील ११ रुग्णांचा समावेश आहे. 



         डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १० रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १ रुग्ण हे वै. ह.भ.प. सावळाराम म्हात्रे क्रिडा संकुल येथून,  ४ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून तसेच १० रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ५९ हजारांचा टप्पा कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ५९ हजारांचा टप्पा Reviewed by News1 Marathi on January 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मुंब्रा बायपास रस्त्याला शिक्षण महर्षी कालसेकर यांचे नाव द्या शमीम खान

ठाणे (प्रतिनिधी)   मुंब्रा शहरातून बायपासच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याला ए. आर. कालसेकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री ...

Post AD

home ads