Header AD

कल्याण डोंबिवलीत १२० नवे रुग्ण, तर दोन जणांचा मृत्यू

 

■५८,१५४ एकूण रुग्ण तर १११२ जणांचा आतापर्यंत मृत्यू

 तर २४ तासांत ५९ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका आज नव्या १२० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


 

 आजच्या या १२० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५८,१५४ झाली आहे. यामध्ये ९६२ रुग्ण उपचार घेत असून ५,०८० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १११२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १२० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१५कल्याण प -४०, डोंबिवली पूर्व २६डोंबिवली प – ३३मांडा टिटवाळा - तर मोहना येथील १ रूग्णाचा समावेश आहे. 


 

     डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ७ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ४ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून ३ रुग्ण डोंबिवली जिमखाना समर्पित रुग्णालय येथून३ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १२० नवे रुग्ण, तर दोन जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत १२० नवे रुग्ण, तर दोन जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on January 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कोपरी पुलाच्या 7 गर्डरचे यशस्वी लॉन्चिंग खासदार राजन विचारे यांचा पहाटे पर्यंत ठिय्या

  ठाणे, प्रतिनिधी   :-    कोपरी पुलाच्या आनंदनगर भुयारी मार्गावरील  7  गर्डर बसविण्याचे काम सकाळी पहाटेपर्यंत सुरू असताना खासदार राजन विचारे...

Post AD

home ads