श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानात भिवंडी शहराचा सिंहाचा वाटा असणार खा कपिल पाटील
भिवंडी , प्रतिनिधी : श्री राम मंदिर उभारणीसाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास यांच्या माध्यमातून संघ परिवारातील विविध संघटना या कामात व्यस्त असून या मध्ये भारतीय जनता पार्टीचा खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा असेल असे वक्तव्य खासदार कपिल पाटील यांनी केले आहे .ते भिवंडी ब्राह्मण आळी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यालयात निधी समर्पण अभियान प्रसंगी बोलत होते.या कार्यक्रमाचा शुभारंभ धार्मिक कबीर मठाचे महावीर दास यांच्या शुभहस्ते महंत महानंदजी दास यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले .याप्रसंगी व्यासपीठावर निधी संकलन अभियान प्रमुख समीर पटेल ,व्याख्याते श्रीपाद जोशी ,आर एस एस सह संयोजक विजय बल्लाळ उपस्थित होते.
राम मंदिराच्या उभारणीच्या कामात आम्हाला सहभागी होता आले हे आमच्यासाठी भाग्याचे असून या कामात भिवंडी शहराचा नावलौकिक मिळविण्याचे यश मिळेल असे यश इतरांपेक्षा अधिक असेल असा विश्वास खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केला. या कार्यात समाजातील आपणा सर्वांना सहभागी होता यावे यासाठी या निधी संकलनाची संकल्पना समोर आली असून ,त्यासाठी समाजातील सर्व घटकांकडून मिळणारे दान हे सत्कारणी लागणार असल्याची भावना कबीर मठाचे महंत महावीरदास यांनी बोलून दाखविली .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सह संयोजक विजय बल्लाळ यांनी भिवंडी शहरातील चार मंडळ कार्यालय व ग्रामीण भागातील मंडळ कार्यालया या समिती अंतर्गत येत असून येथील तब्बल सहा लाख कुटुंबियांची या कार्यात स्वयंसेवक म्हणून काम करणारे स्वयंसेवक दि १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान भेटी घेऊन या निधी संकलनात मदत जमा करणार असल्याची माहिती दिली .या कार्यक्रमा दरम्यान शहरातील विविध समाजातील जाती संस्थांच्या प्रतिनिधींचा महंत महावीर दास यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला .कार्यक्रमास आमदार महेश चौघुले ,भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी ,नगरसेवक सुमित पाटील ,अँड हर्षल पाटील ,मनोज रायचा ,त्रीलोकचंद जैन यांसह असंख्य हितचिंतक स्त्री पुरुष उपस्थित होते
श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानात भिवंडी शहराचा सिंहाचा वाटा असणार खा कपिल पाटील
Reviewed by News1 Marathi
on
January 10, 2021
Rating:

Post a Comment