नेफ्रोप्लस कडून 'गेस्ट्स गॉट टॅलेण्ट सीझन-३'च्या विजेत्यांची घोषणा.
राष्ट्रीय, १५ जानेवारी २०२१ : नेफ्रोप्लस या सुधारित डायलिसिस केअरवर लक्ष केंद्रित करणा-या भारताच्या सर्वात मोठ्या डायलिसिस नेटवर्कने त्यांचा प्रमुख उपक्रम 'गेस्ट्स गॉट टॅलेण्ट' तिस-या पर्वाच्या 'विजेत्यांची' घोषणा केली. मागील दुस-या पर्वाला मिळालेल्या भव्य यशानंतर सप्टेंबरमध्ये घोषणा करण्यात आलेल्या या स्पर्धेचा सर्व डायलिसिस रूग्णांना त्यांची सर्जनशीलता व कौशल्ये दाखवण्यासाठी अद्वितीय व्यासपीठ देण्यावर केंद्रित असलेल्या उपक्रमामध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहित करण्याचा मनसुबा होता.
या पर्वातील स्पर्धेमध्ये देशभरातून २५० हून अधिक रूग्णांनी सहभाग घेतला. गोव्यामधील श्री. अगोस्टिन्हो दा क्रूझ यांनी पहिले बक्षीस जिंकले आणि गुजरातमधील हिमतनगर येथील श्री. अनिकेत हितेंद्र भाई राणा यांनी दुसरे बक्षीस जिंकले. तसेच आंध्रप्रदेशमधील काकीनडामधील श्री. संकरा रविंद्र कुमार यांनी तिसरे बक्षीस जिंकले. या तीन विजेत्यांव्यतिरिक्त नेफ्रोप्लसने पाच इतर प्रशंसनीय सहभागींना कॉन्सोलेशन बक्षीसे दिली. ज्युरीच्या प्रख्यात समूहामध्ये ९४.३ फिव्हर एफएमवर अड्डा ९४३ शोचा आयोजक रेडिओ जॉकी आरजे यशचा समावेश होता. ज्युरींनी सर्जनशीलता व कौशल्याच्या आधारावर विजेत्यांची निवड केली.
'गेस्ट गॉट टॅलेण्ट - सीझन ३'बाबत बोलताना नेफ्रोप्लसचे संस्थापक व मुख्य कार्यकारी श्री. विक्रम वुप्पाला म्हणाले, ''महामारीचा प्रादुर्भाव असताना देखील अत्यंत उत्साहाने सहभागींकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला आनंद देतो. तिन्ही विजेत्यांचे, तसेच या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी वेळात वेळ काढलेल्या प्रत्येक सहभागीचे अभिनंदन! नेफ्रोप्लसच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या अथक मेहनतीमुळे हे यश शक्य झाले आहे. आम्ही वर्षानुवर्षे असाच उत्साह कायम राहण्याची आशा करतो.''
'गेस्ट गॉट टॅलेण्ट, सीझन ३'मधील सहभागाबाबत बोलताना रेडिओ जॉकी आरजे यश म्हणाला, ''मला या अद्वितीय व परिपूर्ण अनुभवाचा भाग होण्याचा अत्यंत आनंद होत आहे. खडतर काळामधून जाणा-या या सर्व रूग्णांमधील सकारात्मकतेमधून आपल्याला भरपूर शिकायला मिळू शकते. या उपक्रमामध्ये नेफ्रोप्लस सारख्या कंपनीने घेतलेला पुढाकार पाहून खूपच आनंद होत आहे. नेफ्रोप्लस वैद्यकीय पैलूवर लक्ष केंद्रित करण्यासोबत डायलिसिस रूग्णांसाठी आनंद व सकारात्मकता देखील निर्माण करते.''
अधिक माहितीसाठी: https://www.nephroplus.com

Post a Comment