केडीएमसीची कोविड-१९ इन्होवेशन पुरस्कारा साठी अंतिम फेरीत निवड
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली मनपाने भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत २५ ऑगस्ट २०२० रोजी भारतातील १०० स्मार्ट सिटींसाठी विविध प्रकारांमध्ये "स्मार्ट सिटी ॲवार्ड" स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका दुस-या फेरीसाठी पात्र ठरली आहे.
त्याचप्रमाणे भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत "कोविड-१९ साठी सर्व महानगरांनी केलेल्या कामाबाबत" कोविड इन्होवेशन पुरस्कार" हा एक विशेष पुरस्कार ठेवण्यात आला असून या पुरस्कारासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आपले सादरीकरण पाठविले होते. संपूर्ण महाराष्ट्रात केवळ कल्याण डोंबिवली महानगरपालिका कोविड इन्होवेशन पुरस्काराच्या अंतिम फेरीत धडक मारली असुन याबाबत अंतिम फेरी लवकरच घेण्यात येणार आहे.

Post a Comment