Header AD

बर्ड फ्लूसाठी ठाणे महानगर पालिकेचा नियंत्रण कक्ष मृत पक्षांची माहिती तात्काळ देण्याचे महापौर आयुक्तांचे आवाहन



ठाणे , प्रतिनिधी  :  बर्ड फ्लूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होवू नये तसेच नागरिकांना योग्य माहिती मिळावी यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने नियंत्रण कक्ष स्थापन केला असून नागरिकांनी मृत पक्ष्यांची माहिती मिळताच तात्काळ नियत्रंण कक्षाला कळविण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी यांनी केले आहे.


देशात काही राज्यांमध्ये बर्ड फ्लूची साथ आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने सतर्ककतेचा उपाय म्हणून नियंत्रण कक्ष निर्माण केला आहे. या साथीमुळे नागरिकांनी घाबरून न जाता मृत झालेल्या पक्ष्यांची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षास देण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्त यांनी केले आहे.


ठाणे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या निगरानीखाली हा नियंत्रण स्थापन केला असून नागरिकांनी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष येथील टोल फ़्री -1800 222 108 तसेच 022 -25371010 या हेल्पलाईनवर माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

बर्ड फ्लूसाठी ठाणे महानगर पालिकेचा नियंत्रण कक्ष मृत पक्षांची माहिती तात्काळ देण्याचे महापौर आयुक्तांचे आवाहन बर्ड फ्लूसाठी ठाणे महानगर पालिकेचा नियंत्रण कक्ष मृत पक्षांची माहिती तात्काळ देण्याचे महापौर आयुक्तांचे आवाहन Reviewed by News1 Marathi on January 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

एस् टी. इंटकच्या अध्यक्ष पदी सचिन शिंदे ...

ठाणे , प्रतिनिधी  :  महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक ठाणे विभागाचे अध्यक्षपद स्व.बाळकृष्ण पुर्णेकर यांनी त्यांच्या हयातीत अनेक वर्ष सक...

Post AD

home ads