Header AD

कल्याण डोंबिवलीत लसीकरणाला सुरवात

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचविणारी कोविशिल्ड लस कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात  १३ जानेवारी रोजी दाखल झाल्यानंतर आज सकाळी १०:३० वाजता पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते फीत कापून लसीकरणास सुरुवात करण्यात आली. महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी प्रथम कोविशिल्ड लसीच्या पहिला डोस घेतला.


जनमानसाच्या मनातील कोरोनाची भीती निघून जावी म्हणून पहिला डोस मीच घेतला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच कोरोनाची लस घेतल्यानंतर मला काहीही त्रास होत नसल्याची प्रतिक्रिया डॉ. अश्विनी पाटील यावेळी दिली. महापालिकेने लसीकरणासाठी आवश्यक सर्व तयारी केली असून न घाबरता ही लस घ्यावीअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.


१३ मार्च पासून चालू असलेला कोरोनाच्या लढ्यात सर्वांनी दिलेल्या सहकार्य बाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी सगळ्यांचे आभार मानले. डॉ. अश्विनी पाटील यांच्या नंतर कल्याण आयएमए अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, बाई रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैदयकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम टिके यांनी देखील यावेळी लस घेतली. डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉ. संतोष केंभवी यांनी लसीच्या पहिला डोस घेतला. तर कल्याण पूर्व येथील शक्तिधाम विलगीकरण  केंद्रामध्ये  महापालिकेच्या डॉ. संदीप निंबाळकर यांनी देखील लसीचा पहिला डोस घेतला. सदर तिन्ही ठिकाणी आजच्या दिवशी १०० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे नियोजन महानगर पालिकेने केले आहे.

कल्याण डोंबिवलीत लसीकरणाला सुरवात कल्याण डोंबिवलीत लसीकरणाला सुरवात Reviewed by News1 Marathi on January 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads