राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माँसाहेब जिजाऊंना अभिवादन
ठाणे , प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ठाणे शहर (जिल्हा) मा. खा. आनंद परांजपे यांच्या हस्ते जिजाऊ मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मध्यवर्ती कार्यालयात साजरी करण्यात आली.
स्वराज्य संकल्पनेच्या बीजाचा वटवृक्ष करण्यासाठी अखंड प्रेरणा ठरलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या रूपाने स्त्री-शक्ती आणि धैर्याचे अतुल्य उदाहरण आपल्याला लाभले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञान, चातुर्य, संघटन, पराक्रम आणि सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता जिजाऊ यांच्या कर्तृत्वाला जयंती दिनी विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सरचिटणीस प्रभाकर सावंत, रवि पालव, युवक अध्यक्ष विक्रम खामकर ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष विजय भामरे , ठाणे शहर विधानसभा कार्याध्यक्ष महेंद्र पवार , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष प्रफुल कांबळे, सामाजिक न्याय विभाग,ठाणे अध्यक्ष कैलास हावळे, वागळे ब्लॉक अध्यक्ष विशाल खामकर, उथळसर ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, वॉर्ड अध्यक्ष विवेक गोडबोले, दिलीप यादव, सतीश साळुंखे, संकेत नारणे , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस सौरभ वर्तक, कळवा ब्लॉक अध्यक्ष निखिल तांबे, युवक वॉर्ड अध्यक्ष विक्रांत चव्हाण, ब्लॉक सरचिटणीस संतोष राऊत, युवक वॉर्ड अध्यक्ष साहिल तिडके, तुषार साळुंखे,विजय पटेल आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment