भारतीय जनता पक्षाच्या ओ.बी.सी.मोर्चा अध्यक्षपदि सचिन केदारी यांची नियुक्ती जाहीर
ठाणे, प्रतिनिधी : ठाणे शहर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या ओ.बी.सी.मोर्चाच्या अध्यक्षपदि भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते सचिन श्रीपत केदारी यांची निवड करण्यात आली.भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड. निरजन डावखरे आणि ठाणे विधानसभा आमदार केळकर साहेब यांनी ही निवड जाहीर केली.
सचिन केदारी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या विविध पदावर काम केले आहे. भा.ज.पा.युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काही वर्षे नेतृत्व केले होते.भा.ज.पा.च्या शहर कार्यकारीणीवर सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली आहे ठाण्यातील माळी समाज संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत असून त्यांच्या निवडीबद्दल ओ.बी.सी.बांधवामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आपल्या निवडीबद्दल बोलताना सचिन केदारी यांनी सांगितले की ओ.बी.सी.प्रवर्गात विविध जाती/समाज येत असून केद्रातील भा.ज.पा.सरकारने या वर्गासाठी घेतलेले विविध निर्णय प्रत्येक स्तरातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून प्रत्येक समाजातील बांधवांना न्याय देण्याचा मानस व्यक्त केला.ठाण्यात ओ.बी.सी.मोर्चाची शक्ति वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून आगामी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत यांचे खरे चित्र दिसेल असा विश्वास त्यांनी दर्शविला.

Post a Comment