Header AD

रेझींग डे निमित्त ठाणे नगर पोलिसांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन




ठाणे , प्रतिनिधी  : महाराष्ट्र पोलिसांच्या रेझींग डे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून ठाणे नगर पोलिसांच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.


पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त अविनाश अंबरे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती पडवी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सुर्यवंशी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात काल बँड वादनाने झाले. शिवाजी मैदानाबाहेर ठाणे पोलीस बँड पथकाने हे वादन केले. 


दरम्यान, या सप्ताहामध्ये ग्राहक जनजागृती, गुन्हेविषयक जनजागृती, रॅली, शस्त्रांचे प्रदर्शन,  ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या विविध गुन्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमालाचे हस्तांतरण करण्यात येणार आहे.

रेझींग डे निमित्त ठाणे नगर पोलिसांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन रेझींग डे निमित्त ठाणे नगर पोलिसांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन Reviewed by News1 Marathi on January 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads