केडीएमटी सेवेतील कोरोना योद्धांना राज्य शासनाची आर्थिक मदत मिळण्यास विलंब
कल्याण , कुणाल म्हात्रे : केडीएमटी सेवेत कोरोना काळात सेवेत रूजु राहुन कोरोनाची लागण झाल्याने मुत्यु पावलेल्या कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना अघाप देखील मदत मिळु शकली नसल्याने ते मदतीपासून वंचित राहिले आहेत. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना काम करावे लागत होते. अश्या वेळी काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. केडीएमसीच्या परिवहन उपक्रमातील दोन बसचालक आणि चार बसवाहक यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोरोना काळात जे सरकारी अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, पोलीस यांचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्यांना राज्य शासनाकडून ५० लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल.
परिवहन सेवेतील वाहक संतोष खंबाळे, हुसेन बादशहा कोलार, सुरेश कडलग, संजय तडवी, चालक रमेश नरे, राजेंद्र तळेले यांचा कोरोनाने बळी घेतला होता. या सहाजणांना राज्य शासनाची मदत मिळावी म्हणून परिवहन सेवेने पुण्यातील आरोग्य संचनालय यांना संपर्क केला होता. आवश्यक कागद पात्रांची पूर्तता करून परिवहन सेवेने पालिकेच्या सामान्य प्रशासनाला तशी कागदपत्रे दिली आहे. परिवहन सेवेतील अनेक कोरोना योद्धांना राज्य शासनाची मदत मिळावी म्हणून परिवहन समितीचे सभापती मनोज चौधरी, परिवहन समितीचे माजी सभापती तथा सदस्य संजय पावशे, संजय राणे आणि परिवहन व्यवस्थापक मिलिंद धाट हे प्रयत्न करत आहेत. दरम्यान या सहा कोरोना योद्धांना शासनाची मदत मिळण्यास विलंब लागत असल्याने परिवहन सेवेतील कर्मचारी वर्गामध्ये राज्य शासनाबाबत नाराजी पसरली आहे.

Post a Comment