Header AD

निष्पक्ष चौकशी साठी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा रेखा ठाकूर
मुंबई, दि.१४ :-  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध रेणू शर्मा या महिलेने केलेले आरोप गंभीर आहेत. या प्रकरणी एफआयआर नोंदवून घेण्यास पोलीस नकार देत आहेत. ही त्याहून गंभीर बाब आहे. या प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी होऊन निर्दोष सिद्ध होई पर्यंत मुंडे यांना सामाजिक न्याय मंत्री या पदावरून दूर ठेवले पाहिजे. या प्रकरणी न्याय होईल याची खात्री महाराष्ट्रातील जनतेला पटली पाहिजे. बलात्काराचा आरोपी सामाजिक न्याय मंत्री कसा असू शकतो? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.


आज देशात कठोर कायदे करून ही बलात्काराचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत आहे. याचे कारण महिलांचे शोषण करणा-यांना सत्ता व प्रतिष्ठा मिळत आहे व आरोपींची निष्पक्ष चौकशी करण्याऐवजी राजाश्रय देऊन आरोपींचे समर्थन करण्याचे घृणास्पद कृत्य ही वाढत आहे.


धनंजय मुंडें यांच्या प्रकरणात तक्रारदार महिले विरोधात आरोप करुन सारवा सारव करत आहेत व प्रसार माध्यमेही पिडितेची बाजु न मांडता संभ्रम निर्माण करत आहेत. तक्रार करणाऱ्या महिलेची सोशल मिडियावरुन बदनामी करुन तोंड बंद करण्याची युक्ती बलात्काराचे आरोपी नेहमीच करत असतात. सामाजिक न्याय मंत्री पदावरील व्यक्तीला हे शोभनीय नाही. आरोपी धनंजय मुंडेंनी पीडीत महिला विरोधी वक्तव्य करणे व वकिली युक्ती वादाने न्यायप्रलंबित प्रकरणात प्रभाव टाकणे हे नितीला व न्यायाला धरुन नाही. 


या प्रकरणात निष्पक्षपाती चौकशी होऊन महाराष्ट्रातील जनतेसमोर सत्य आले पाहीजे यासाठी धनंजय मुंडेंनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी या वेळी केली. या वेळी त्यांच्या सोबत पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अशोक सोनोने, राज्य प्रवक्ते फारुख अहमद, सिद्धार्थ मोकळे, गोविंद दळवी आणि प्रियदर्शी तेलंग उपस्थित होते.

निष्पक्ष चौकशी साठी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा रेखा ठाकूर निष्पक्ष चौकशी साठी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा रेखा ठाकूर Reviewed by News1 Marathi on January 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads