Header AD

महिलांच्या सुरक्षितते साठी भाजपचा पुढाकार एमआयडीसी परिसरात विजेचे खांब लावण्याची मागणी..

 डोंबिवली , शंकर जाधव : अनलॉक प्रकिया सुरु झाली असून नागरिक कामानिमित्त घराबाहेर पडत आहेत.दिवसात रत्यावर उजेड असल्याने नागरिकांना घरी परतताना काळजी नसते. परंतु सायंकाळी अंधार पडल्यावर रस्त्यावर नागरिकांना असुरक्षित वाटावे असे वातावरण डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी परिसरात पसरले आहे.पोलीस गस्त घालत असले तरी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत महिलाच्या गळ्यातील सोन्याचे दागिने धुमस्टाईलने हिसकावून पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


यासाठी रस्त्याच्या कडेला विजेचे खांब लावणे गरजेचे असते. जेणेकरून नागरिकांना बिनदास्तपणे चालता येऊ शकते.मात्र एमआयडीसी परिसरात विजेचे खांब असून त्यावरील वीज गुल झाली आहे.यावर लक्ष देत महिलांच्या सुरक्षिततेसाठी भाजपचा पुढाकार घेतला आहे. भाजपच्या माजी नगरसेविका डॉ. सुनिता पाटील आणि डोंबिवलीग्रामीण अध्यक्षा मनीषा राणे यांनी निवासी भागातील  वीज कंपनीच्या कार्यालयात यांची भेट देऊन यासंदर्भात पत्र दिले.एमआयडीसी परिसरातील विजेच्या खांबावरील वीज पुरवठा सुरु करावा अशी मागणी केली आहे.

महिलांच्या सुरक्षितते साठी भाजपचा पुढाकार एमआयडीसी परिसरात विजेचे खांब लावण्याची मागणी.. महिलांच्या सुरक्षितते साठी भाजपचा पुढाकार एमआयडीसी परिसरात विजेचे खांब लावण्याची मागणी..  Reviewed by News1 Marathi on January 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads