Header AD

माजी सरपंच अर्जुन पाटील यांच्या वतीने उसरघर गावात गरीब व विधवा महिलांना मोफत साड्या वाटप
डोंबिवली , शंकर जाधव  :  काटई गावचे माजी सरपंच अर्जुन पाटील यांच्या वतीने डोंबिवलीजवळील उसरघर गावातील महिलांसाठी गणपती मंदिराच्या आवारात साड्या वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी सरपंच अर्जुन पाटील, उसरघर गावाचे पांडुरंग संते, भोपर गावचे एकनाथ पाटील,दिवा येथील शैलेश पाटील,कोळे गावचे हनुमान महाराज पाटील आणि काटई गावचे नरेश पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


यावेळी भोपर गावचे एकनाथ पाटील म्हणाले, माजी सरपंच अर्जुन पाटील यांच्या समाजकार्याचा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे. तर यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी अर्जुन पाटील यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.४० वर्षावरील नागरिकांसाठी क्रिकेट स्पर्धा, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,गरीब आणि गरजू महिलांसाठी अन्नधान्य, अध्यात्मिक क्षेत्रात भरीव कामगिरीबाबत ग्रामस्थांनी कौतुक केले.

माजी सरपंच अर्जुन पाटील यांच्या वतीने उसरघर गावात गरीब व विधवा महिलांना मोफत साड्या वाटप माजी सरपंच अर्जुन पाटील यांच्या वतीने उसरघर गावात गरीब व विधवा महिलांना मोफत साड्या वाटप Reviewed by News1 Marathi on January 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads