श्रमजीवी सेवा दलाच्या युवकांनी राबविले भिवंडी तहसील कार्यालय परिसरात स्वच्छता अभियान...
भिवंडी , प्रतिनिधी : आदिवासी कष्टकरी समाजाच्या प्रश्नांवर झटणाऱ्या श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून तरुण युवकांना स्वावलंबी ,संस्कारक्षम बनविण्यासाठी श्रमजीवी सेवा दलाची स्थापना करण्यात आली असून भिवंडी तालुक्यात २३ गावांमधून या शाखा स्थापन करण्यात आल्या आहेत .येथील युवकांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त स्वावलंबन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये भिवंडी तहसीलदार व पंचायत समिती कार्यालय परिसराची स्वच्छता या युवकांनी केली .
कार्यक्रमाचा शुभारंभ तहसीलदार अधिक पाटील यांच्या शुभहस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण कातून करण्यात आला .या प्रसंगी गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे ,सह गटविकास अधिकारी अविनाश मोहिते ,श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील लोणे ,पदाधिकारी संगीता भोमटे, आशा भोईर, मोतीराम नामखुडा,यांसह युवक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
युवकांचे आजचे वय हे संस्कारक्षम असल्याने त्यांच्या कडून कष्टाची कामे स्वावलंबनात करून घेत असतानाच त्यांच्या कडून स्वच्छतेचे काम केले जात असताना या उपक्रमात सहभागी युवक हे शिक्षित असल्याने त्यांना कार्यालयातील संचिका सुव्यवस्थित करणे ,त्या व्यवस्थित लावून घेणे या कार्यालयीन कामात सहभागी करून घेण्याचा मानस तहसीलदार यांनी बोलून दाखवला .या युवकांनी तहसील कार्यालयासह पंचायत समिती आवारातील स्वच्छता करून कार्यालयाच्या दर्शनी भागातील दरवाजे व इतर स्वच्छता केली .
श्रमजीवी सेवा दलाच्या युवकांनी राबविले भिवंडी तहसील कार्यालय परिसरात स्वच्छता अभियान...
Reviewed by News1 Marathi
on
January 19, 2021
Rating:

Post a Comment