Header AD

राम मंदिर उभारणी साठी कल्याण विभागातून संकलित करणार ३५ कोटी निधी विश्व हिंदू परिषदेचा निर्धार
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासद्वारा श्री राम जन्मभूमी स्थानी भव्य मंदिर उभारणी करिता निधी संकलनाचे आयोजन करण्यात आले असून याउपक्रमात कल्याण विभागातील कल्याण, भिवंडी, अंबरनाथ व पालघर या ठिकाणाहून  ३५ कोटी निधी उभारण्याचा निर्धार विश्व हिंदू परिषदेने केला असल्याची माहिती श्री राम मंदिर निधी संकलन अभियान प्रमुख आणि विश्वहिंदू परिषदेचे कल्याण विभाग मंत्री अॅड. मनोज रायचा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वि.हि.प. चे जिल्हा मंत्री अभिषेक गोडबोले, वि.हि.प. मातृशक्ती प्रमुख अॅड. सुधा जोशी,   श्री राम मंदिर निधी संकलन अभियान कल्याण जिल्हा अभियान प्रमुख रोशन जगताप उपस्थित होते.


       राम मंदिर उभारणीकरिता संपूर्ण देशभर संघपरिवार योगदान देणार असून संघरचनेप्रमाणे कल्याण विभागातील ४ जिल्हे कल्याण, भिवंडी, अंबरनाथ व पालघर या चारही जिल्ह्यात संस्थेचे कार्यलय उघडण्यात आले आहे. त्या अनुषंगाने नगर, तालुका, मंडळ, वस्त्या, प्रखंड, खंड या रचनेत संघ परिवाराच्या सर्व कार्यकर्त्यांना जनसंपर्क करण्याचे व प्रत्येक व्यक्तीकडून मंदिरासाठी काहीना काही अनुदान मिळाले पाहिजे भूमिकेतून १० रु, १०० व १००० चे कुपन तसेच रक्कम २००० पेक्षा जास्त अनुदान करिता पावती पुस्तकाद्वारे धनराशी स्वीकारण्यात येणार आहे.


       कल्याण विभागात १५ जानेवारी ते २० फेब्रुवारीपर्यंत एकूण १६ लाख ६९ हजार कुटुंब आणि ५० लाख व्यक्तींशी संपर्क करण्यात येणार आहे. या सर्वांकडून अंदाजे ३५ कोटी धनराशी संकलित करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. या अभियानास सर्व भारतीयांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त निधी राम मंदिरा करिता समर्पित करण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषदतर्फे करण्यात आले आहे.     

राम मंदिर उभारणी साठी कल्याण विभागातून संकलित करणार ३५ कोटी निधी विश्व हिंदू परिषदेचा निर्धार राम मंदिर उभारणी साठी कल्याण विभागातून संकलित करणार ३५ कोटी निधी  विश्व हिंदू परिषदेचा निर्धार Reviewed by News1 Marathi on January 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रुग्णालयाच्या पॅसेज मध्ये ऑक्सिजन लावून रुग्णांवर उपचार

■कल्याण डोंबिवलीत आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्र....   कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  :   रुग्णालयाच्या पॅसेजमध्ये ऑक्सिजन लावून रुग्णांवर उपचार...

Post AD

home ads