Header AD

महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराचा सामान्य नागरिकांवर बोजा का?


सोसायटीकडून १० लाख भरपाईच्या प्रस्तावावरून निरंजन डावखरे यांची टीका...


ठाणे, प्रतिनिधी  :  सेप्टीक टॅंक मलप्रक्रिया केंद्राची सफाई करताना दुर्घटना घडल्यास १० लाखांची भरपाई सोसायटीकडून वसूल करण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावाला भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी तीव्र विरोध केला आहे. महापालिकेच्या निष्क्रिय कारभारामुळे शहराची जबाबदारी झटकतानाच, कंत्राटदारांना मोकळे सोडून सामान्य नागरिकांवर बोजा का लादला जात आहे, असा सवालही आमदार डावखरे यांनी केला आहे.


घोडबंदर रोडवरील प्राईड प्रेसिडन्सी या इमारतीच्या मलप्रक्रिया केंद्र सफाईच्या वेळी विषारी वायूबाधेमुळे तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अद्यापि मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळालेली नाही. याबाबत राज्य सरकारकडून महापालिकेला विचारणा केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशी दुर्घटना घडल्यास संबंधित मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना सोसायटीने मदत करावी. त्यांना मदत करण्यास ३० दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागल्यास महापालिकेकडून मृताच्या नातेवाईकाला दहा लाखांची मदत दिली जाईल. तसेच या भरपाईची सोसायटीच्या मालमत्ता करातून वसुली केली जाईल, असा प्रस्ताव महापालिकेने उद्या बुधवारी होणाऱ्या महासभेत मांडला आहे. या प्रस्तावाला आमदार निरंजन डावखरे यांनी विरोध केला.


मलप्रक्रिया केंद्र सफाई करणाऱ्या कामगारांना सुरक्षा साधने व उपकरणे देण्याची तरतूद आहे. त्याची पूर्तता कंत्राटदारांकडून केली जात नसल्याने दुर्घटना होतात. अशा परिस्थितीत केवळ राज्य सरकारकडून प्राईड रेसिडन्सी घटनेसंदर्भात सरकारकडून विचारणा होत असल्यामुळे जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या रहिवाशी सोसायटीवर बोजा टाकला जात आहे. कायद्यात तरतूद नसताना सोसायट्यांकडून भरपाई घेण्याचा नियम महापालिकेने कोठून शोधून काढला, असा सवाल आमदार निरंजन डावखरे यांनी केला. 


दिव्यांग-महिला-बालकल्याण निधीत कपातीला विरोध


दिव्यांग व्यक्ती आणि महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांसाठी गेल्या वर्षी ३४ कोटींचा निधी ठेवण्यात आला होता. मात्र, यंदा कोरोनाच्या नावाने त्यात कपात करून तो अवघ्या २० कोटी रुपयांवर आणला गेल्याबद्दल आमदार निरंजन डावखरे यांनी आक्षेप घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरज नसतानाही काही हॉस्पीटल उभारण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण करण्यात आली. मात्र, दिव्यांग-महिला बालकल्याण विभागाच्या योजनांना कात्री का, असा सवाल श्री. डावखरे यांनी केला आहे.


कोरोना लस मोफत द्यावी


ठाणे शहरातील दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना कोरोना लस विकत घेणे परवडणारे नाही. राज्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांनी सर्व नागरिकांना कोरोना लस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेही दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती व सहानुभूती म्हणून ज्येष्ठ नागरिकांना मोफत लस द्यावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली आहे.


कर्णबधीरांना मोफत श्रवणयंत्रे....


समन्वय प्रतिष्ठान, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय आणि अली यावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था मुंबई यांच्या वतीने ठाण्यात उद्या २० व २१ जानेवारी रोजी होणाऱ्या शिबिरात कर्णबधीरांना मोफत श्रवणयंत्रे देण्यात येणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. डावखरे यांनी केले.

महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराचा सामान्य नागरिकांवर बोजा का? महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराचा  सामान्य नागरिकांवर बोजा का? Reviewed by News1 Marathi on January 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads