कल्याण मध्ये रेझिंग डे सप्ताह निमित्त ६५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला परत
कल्याण , कुणाल म्हात्रे : सध्या पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा केला जात असून यानिमित्ताने पोलिसांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. रेझिंग डे च्या पार्श्वभूमीवर आज कल्याण पोलिसांनी चोरीला गेलेली रोकड, दागिने, मोबाईल, दुचाकी, रिक्षा व इतर वाहने असा तब्बल ६५ लाखांचा मुद्देमाल चोरट्याकडून जप्त करत ह्या वस्तू नागरिकांना परत केल्या आहेत. यामध्ये एटीएम मधून चोरी केलेल्या ४० रक्कमेचा समावेश होता. आपल्या वस्तू आणि पैसे परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांना धन्यवाद दिले.
बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या हस्ते हा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला. यावेळी कल्याण विभागाचे एसीपी अनिल पोवार, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे व.पो.नि. यशवंत चव्हाण, खडकपाडा पोलीस स्टेशनचे व.पो.नि. अशोक पवार, महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे व.पो.नि. नारायण बानकर, कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे व.पो.नि. शाहूराजे साळवे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
Post a Comment