Header AD

बजेटसाठी स्टॉक्स निवडताना कोणत्या घटकांकडे लक्ष द्यावे?

 केंद्रीय अर्थसंकल्प लवकरच जाहीर होणार आहे. काही दिवसातच, माननीय अर्थमंत्री आगामी आर्थिक वर्षासाठी देशाचा आर्थिक रोडमॅप जाहीर करतील. यासाठीची उत्सुकता आधीच शिगेला पोहोचली आहे. सामान्य माणसापासून व्यावसायिकांपर्यंत प्रत्येकजण स्वत:च्या अपेक्षायादीसह तयार आहे. त्यामुळे शेअर बाजारदेखील तेवढ्याच प्रमाणात उत्साही आहे. त्यामुळे पुढील संपूर्ण वर्षासाठी बही-खात्यातून देशाचे भविष्य ठरणार असल्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही स्वत:ची स्थिती कशी निश्चित कराल. तसेच बजेटसाठी स्टॉक्स निवडताना कोणत्या घटकांकडे लक्ष द्यावे याबद्दल सांगताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे इक्विटी स्ट्रॅटजिस्ट श्री ज्योती रॉय.


१. अस्थिरतेची अपेक्षा ठेवा: बजेटपूर्वी बाजारात बराच सट्टा लावला जातो. अर्थतज्ञांनी त्यांचे अंदाज तयार ठेवले आहेत. बिझनेस लीडर्सनादेखील त्यांच्या मागण्या कळवल्या आहेत. एक्स्ट्रापोलेशनसह विविध आकडे आणि अंदाजही लावण्यात आले आहेत. गुंतवणूकदारांनी आपापली स्थिती घेतल्यामुळे बाजारातील सट्ट्यांमध्ये याचे योगदान मिळते. काही स्टॉक्स त्यांच्या योग्य बाजारभावापेक्षा कमी मूल्यावर व्यापार करतात. त्याचवेळेला काही स्टॉकमध्ये वेगाने बदल घडू शकतात अशीच अपेक्षा ठेवा.


२. सट्टा लावू नका: काही अंदाजानुसार, बाजारातील स्थान ठरवणे, हे खूप रोमांचक वाटते. मात्र बजेट त्यावर आधारीत नसते, हे लक्षात ठेवा. ते वास्तविक आर्थिक आकडेवारी, उपलब्ध स्रोत आणि तत्काळ व दीर्घकालीन गरजा यांवर आधाारीत असते. म्हणून तुमच्या पोर्टफोलिओत सट्ट्यावर आधारीत निर्णय घेणे टाळा.


३. लाँग टर्म फंडामेंटल्समध्ये गुंतवणूक करा: उच्च अस्थिरता असताना शॉर्ट टर्ममध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय योग्य नाही. आपण दीर्घकालीन फंडामेंटल कॉलमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. कोणत्या स्टॉकमध्ये मजबूत फंडामेंटल्स, चांगले व्यवसाय मॉडेल, वाजवी मूल्यांकन आणि एक सकारात्मक ऐतिहासिक कामगिरी आहे, याचा अभ्यास कर व त्यासाठी प्रयत्न करा. यामुळे शॉर्ट टर्म कॉल्सऐवजी तुमच्या पोर्टफोलिओत विविधता येईल. कारण त्यात सुधारणा होऊ शकतात.


४. घसरणीत खरेदी करा: लाँग टर्म फंडामेंटल्स असलेल्या स्टॉक्सची यादी तयार करण्याचा आणखी एक सकारात्मक परिणाम आहे. या पद्धतीचा वापर केल्यास, तुम्ही असे काही स्टॉक्स खरेदी करू शकता, ज्यात काही दिवसांनी बदल होऊ शकतात. सट्टेबाज कॉल बजेटच्या दिवशी त्यांची खरी किंमत दर्शवतात. कधी कधी, चांगले लाँगटर्म फंडामेंटल्स असलेल्या स्टॉक्स वाढतात देखील. त्यामुळे अशा स्टॉक्सची यादी तयार ठेवा. त्यापैकी काही स्टॉकमध्ये बजेटच्या दिवशी किंवा त्यापूर्वी काही सुधारणा झाल्या आहेत का हे पहा. घसरणीच्या स्थितीत ते खरेदी करा.


तात्पर्य असे की, आपले गुंतवणूक धोरण बातम्यांद्वारे नव्हे तर मूलभूत किंवा स्थिर मूल्यांनुसार ठरवा. त्यामुळे संबंधित नुकसानाऐवजी तुमचा पोर्टफोलिओ दीर्घकाळ चालेल. केंद्रीय बजेट हे देशाच्या वृद्धीच्या कथेचा एक महत्त्वाचा भाग आहे. यातून जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करा.

बजेटसाठी स्टॉक्स निवडताना कोणत्या घटकांकडे लक्ष द्यावे? बजेटसाठी स्टॉक्स निवडताना कोणत्या घटकांकडे लक्ष द्यावे? Reviewed by News1 Marathi on January 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads