Header AD

कुणाल पाटील हे कार्य तत्पर लोक प्रतिनिधी – नाना पटोले

 

◆विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली नगरसेवक कुणाल पाटील यांच्या कार्यालयाला भेट...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  नगरसेवक कुणाल पाटील हे कार्यतत्पर लोकप्रतिनिधी असूनत्यांचे समाजकार्यही मोठे आहे. भविष्यातही त्यांच्या हातून असेच कार्य होत राहोअशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो  असे मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले गुरुवारी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी भिवंडीकल्याण, मुरबाडसह अन्य ठिकाणी कार्यक्रमांना हजेरी लावली. तसेच केडीएमसीचे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांची कल्याण येथे भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


पाटील हे कार्यतत्पर लोकप्रतिनिधी असूनत्यांचे समाजकार्यही मोठे आहे. भविष्यातही त्यांच्या हातून असेच कार्य होत राहोअशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व पुढील वाटचालीस शुभेच्छा देतोअसे पटोले यावेळी म्हणाले. दरम्यानपाटील यांचा बुधवारी वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने आरोग्य तपासणीरक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिकांसाठी नेत्रतपासणी, साथीच्या आजारांबाबत जनजागृती, रुग्णांना फळेवाटपगरिबांसाठी अन्नदान आदी उपक्रम राबवण्यात आले. या प्रसंगी मनसेचे आमदार राजू पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार आदींसह सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकारी, सामान्य नागरिक उपस्थित होते.


तर नाना पटोले हे  विधानसभा अध्यक्ष या उच्च पदी असुन देखील माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याचा वाढदिवसानिमित्त दिलेली ही अनोखी भेट मनात घर करून गेली असून नाना भाऊंनी अनेकानेक शुभेच्छासह पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिली.

कुणाल पाटील हे कार्य तत्पर लोक प्रतिनिधी – नाना पटोले कुणाल पाटील हे कार्य तत्पर लोक प्रतिनिधी – नाना पटोले Reviewed by News1 Marathi on January 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads