Header AD

रायझिंग डे निमित्त नागरिकांना दिले सुरक्षिततेचे धडे




कल्याण , कुणाल  म्हात्रे  : महाराष्ट्र पोलीस रायझिंग डे निमित्त महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन अंतर्गत सुरक्षतेबाबत कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी महिला सुरक्षितता, अमली पदार्थाचे सेवन आणि कोरोना पासून कसे बचाव करावे याबबात मार्गदर्शन करण्यात आले. 


कल्याणच्या प्रभाग क्र ३६ येथील साबीर शेख उद्यानात कोरोना पासून आपले बचाव करणे, महिला सुरक्षा आणि अमली पदार्थ बाबत रायझिंग डे निमित्त नागरिकाना मार्गदर्शन केले. यावेळी सहय्यक पोलीस निरीक्षक ढोले, महिला पोलीस उपनिरीक्षक शेलार आणि गुडवे, पोलीस नाईक चव्हाण हे उपस्थित होते. आपली काळजी आपणच घ्याला पाहिजे, कोरोना अजून संपला नसून त्याबाबत योग्य ती काळजी घ्यावी. तसेच अमली पदार्थाचे सेवन करू नये आणि महिलांनी आपल्या सुरक्षतेबाबत दक्ष राहावे याबाबत मनसे कल्याण शहर संघटक रुपेश भोईर यांनी देखील नागरिकांना संबोधित केले.
रायझिंग डे निमित्त नागरिकांना दिले सुरक्षिततेचे धडे  रायझिंग डे निमित्त नागरिकांना दिले सुरक्षिततेचे धडे Reviewed by News1 Marathi on January 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्याची शुभारंभ

कळवा  , अशोक  घाग  :   प्रभाग क्रमांक 9 स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांच्या प्रभाग सुधारणा निधीतून खारीगाव येथील दत्तवाडी परिसरातील विघ्नहर्त...

Post AD

home ads