Header AD

नगर पंचायतींना निधीची कमतरता पडू देणार नाही नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही आटपाडी नगरपंचायती ऐवजी नगर परिषद करणार

 सांगली : नगरपरिषद आणि नगरपंचायत यांना विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यासोबतच सांगली जिल्ह्यातील आटपाडी नगरपंचायत ऐवजी नगर परिषद करण्यात येईल त्याबाबतचा प्रस्ताव नगरविकास विभागाला प्रस्ताव पाठवण्याची सूचना श्री. शिंदे यांनी केली. गुंठेवारीसंदर्भात कट ऑफची डिसेंबर २०२० पर्यंत वाढवून सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे, असेही ते म्हणाले.


सांगली जिल्ह्यातील नगरपंचायत आणि नगर परिषदांमधील  विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आज नगरविकास मंत्री सांगली दौऱ्यावर आले होते. यावेळी माननीय जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, नगरविकास विभागाचे सचिव महेश पाठक, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी, जिल्ह्यातील आमदार अनिल बाबर, सुमनताई पाटील हे उपस्थित होते.
एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीमुळे होणारे बदल लोकप्रतिनिधी व प्रशासनाला लक्षात आणून देण्यासाठी विशेष सादरीकरण यावेळी करण्यात आले. बदललेल्या विकास नियंत्रण नियमावलीचे फायदे लोकांना मिळणार असून हे निर्णय लोकांपर्यंत पोहचावे यासाठी अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागवार कार्यशाळा घेण्यात येईल, असे श्री शिंदे म्हणाले.


माननीय मंत्री जयंत पाटील यांनी अष्टआ आणि ईस्लामपूर याबाबत पत्र लिहून केलेल्या सूचना नक्की पूर्ण करू असही त्यांनी स्पष्ट केलं.तसच विटा, तासगाव येतील पाणी पुरवठा पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी नगरविकास विभागाचे सचिव महेश पाठक यांनी केल्या. त्यासोबतच पलुस पाणीपुरवठा योजनेतील भूसंपादनाच्या कामाला गती देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. 


आटपाडी मधील गदिमांच स्मारक नाट्यगृहाचा प्रश्न लवकरच सोडवणार


आटपाडीमधील ग. दी. माडगूळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात येणारे प्रस्तावित नाट्यगृह आणि स्मारक जमीन अधिग्रहणामुळे रखडले आहे, याकडे आमदार अनिल बाबर यांनी लक्ष वेधले. त्यावर याबाबत नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढू, असे श्री शिंदे म्हणाले. आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे गीतरामायणकार गदिमा हे महाराष्ट्राचे वैभव असून त्यांच्या लौकिकाला साजेसे स्मारक उभे करू, असे श्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

नगर पंचायतींना निधीची कमतरता पडू देणार नाही नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही आटपाडी नगरपंचायती ऐवजी नगर परिषद करणार नगर पंचायतींना निधीची कमतरता पडू देणार नाही नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही आटपाडी नगरपंचायती ऐवजी नगर परिषद करणार Reviewed by News1 Marathi on January 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads