भिवंडी , प्रतिनिधी : भिवंडी शहर व ग्रामिण भागात पाणीपुरवठा करणारी स्टेम लाईन वरील शहरातील फेणेपाडा या ठिकाणी ६०० मिमी व्यासाच्या पाईपलाईन वर महानगरपालिका प्रशासनाने फेणेगाव ,फेणेपाडा ,मानसरोवर या भागात पाणीपुरवठा करणाऱ्या नळ जोडणी सह अनधिकृत नळ जोडणी पाईप लाईन कापुन कारवाई केली आहे .या कारवाई मुळे महानगरपालिका क्षेत्रातील फेणेगाव,फेणेपाडा ,मानसरोवर या निवासी भागातील सुमारे २० हजार हुन अधिक लोकसंख्या मागील तीन दिवसांपासून पाणी पुरवठा बंद राहिल्याने त्यांना पाण्या पासून वंचित
राहावे लागल्याने संबधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
स्टेम प्राधिकरणा कडून भिवंडी ठाणे मीरा भाईंदर या महानगरपालिका क्षेत्रासह भिवंडी तालुक्यातील ३४ ग्रामपंचायत क्षेत्रात पाणीपुरवठा केला जात असून खारबाव रस्त्यावरील राहनाळ ,कालवार, वडघर, वडूनवघर,कारीवली , खारबाव ,जुनांदुरखी या ग्रामपंचायत क्षेत्रासह महानगरपालिका हद्दीतील ताडाळी, कामतघर , नारपोली या भागास ६०० मिमी व्यासाच्या पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फेणेगाव या भागातून जात असून या लाईन वर फेणेगाव या भागातील नागरी वास्तुस पाणीपुरवठा करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने टॅपिंग केले होते .शनिवारी स्टेम चे भिवंडी पथकातील उपअभियंता अजय चौधरी यांनी ग्रामीण भागातील पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने तेथील ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांच्या तक्रारी नंतर या पाईपलाईन वरील नळ जोडणी तोडून येथील पाणीपुरवठा खंडित केला आहे .
विशेष म्हणजे महानगरपालिका क्षेत्रात होत असलेल्या या कारवाईची माहिती स्थानिक महानगर पालिका प्रशासनास नसल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक सभागृह नेता शाम अग्रवाल यांनी केला आहे .महानगरपालिका प्रशासनाने स्थानिक नागरीकांसाठी केलेली व्यवस्था बंद करून येथील नागरीकांना तीन दिवस पाण्यावचजन ठेवण्याचे अधिकार परस्पर स्टेमला कोणी दिले असा सवाल उपस्थित करीत ,ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुका सुरू असून त्या माध्यमातून तेथील राजकीय व्यक्तींना लाभ पोहचविण्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप शाम अग्रवाल यांनी केला आहे
Post a Comment