कल्याण , कुणाल म्हात्रे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वाहतूक आघाडीच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी विलास गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
आरपीआयच्या राष्ट्रीय चिटणीस शिला गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक मुलुंड येथील आर.पी.आय कार्यालयामध्ये घेण्यात येऊन ठाणे जिल्ह्यातील अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या शिफारसी नुसार या बैठकीत विलास गायकवाड यांची ठाणे जिल्हा वाहतुक आघाडीच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. पक्षाने आपल्यावर सोपवलेली जवाबदारी योग्य रीतीने पार पाडून रिक्षा टॅक्सीचालक तसेच इतर वाहतूकदारांच्या समस्या सोडवत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित ठाणे जिल्हा अध्यक्ष विलास गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे, राष्ट्रीय चिटणीस शिला गांगुर्डे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिल गांगुर्डे, अण्णा रोकडे, प्रदेश सहसचिव बाळकृष्ण गायकवाड, ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष अपेक्षा दळवी, कल्याण ङोबीवली महिला अध्यक्ष मिना साळवे, जिल्हा सरचिटणीस भिमराव ङोळस, कल्याण ङोबीवली युवा कार्याध्यक्ष भारत सोनवणे, वाहतुक आघाडी संपर्क प्रमुख संतोष लाङ, ईशान्य मुंबई युथ अध्यक्ष विनोद जाधव, युवा नेते राजू साळवे, रिपाई शहापूर प्रवक्ता सुनिल जगताप, भिवंडी तालुका अध्यक्ष संगिता गायकवाड, कल्याण ङोबीवली उपाध्यक्ष अमित शिंदे, कल्याण रिक्षा युनियन अध्यक्ष अरविंद अंगारखे आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
विलास गायकवाड हे गेल्या २० वर्षांपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे क्रियाशील सदस्य असून आरपीआय भिवंडी तालुका कार्यकारणी मध्ये संघटक व तालुका उपाध्यक्ष पदावर ५ वर्षे कार्यरत होते. कल्याण मध्ये २००७ पासून रिपब्लिकन रिक्षा-टॅक्सी संघटनेमध्ये कार्याध्यक्ष, सरचिटणीस व कल्याण शहर अध्यक्ष आदि पदांवर राहून रिक्षा टॅक्सी टेम्पो चे अनेक स्टँड उभारले. वाहतुकीच्या अनेक प्रश्नांवरती त्यांनी अनेक आंदोलने करून रिक्षा- टॅक्सी धारकांना न्याय देण्याचे काम गायकवाड यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याचा आढावा घेवून त्यांना रिपाइं (आठवले) वाहतुक आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात यावी यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक पदाधिकाऱ्यांनी शिफारस पत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला त्यांच्या नियुक्तीमुळे रिक्षा चालक मालक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Post a Comment