Header AD

बिर्ला कॉलेज जवळ पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज जवळ पोलीस लाईन गेट समोर पाण्याच्या मुख्य लाईनच्या एअर वाँलला बसचा धक्का बसल्याने वाँल तुटला यामुळे  हजारो लीटर पाणी वाया गेले.     

     
   कल्याण पश्चिमेतील बिर्ला काँलेज परिसर येथील पोलिस लाईन गेट जवळील पाणी पुरवठा वितरण वाहिनीच्या वाँलला शनिवारी सकाळी ८.३०च्या सुमारास बसचा धक्का लागल्याने पाण्याच्या  मुख्य लाईनचा एअर वाँल तुटल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले. परिसरातील मनसे पदाधिकारी सुनील उतेकर, गणेश नाईक, सतीश मोरे, नितीन गायकवाड, भरत गायकवाड, मलबारी यांनी घटनेची दखल घेत " ब "प्रभाग पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता राठोड यांच्याशी संपर्क साधला. यावेळी  घटनास्थळी पाणी पुरवठा आधिकारी व दुरूस्ती पथकाने तातडीने पोहचत  दुरुस्ती करीत पाणी गळती थांबिवली.          

                 याबाबत पाणी पुरवठा  विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांंच्याशी संपर्क साधला असता  बसचा धक्का लागल्याने मुख्य पाणी पुरवठा लाईनचा एअर वाँल बाधित  झाल्याने पाणी गळती सुरु झाली. घटनास्थळी पोहचत तासाभरात "ब" प्रभाग पाणी पुरवठा दुरूस्ती पथकाने दुरूस्ती करीत पाणी गळती थांबवली असल्याचे त्यांनी सांगितले.
बिर्ला कॉलेज जवळ पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया  बिर्ला कॉलेज जवळ पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया Reviewed by News1 Marathi on January 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads