Header AD

२०वर्षांत सायकल वरून तब्बल १०० किल्ल्यांवर चढाई कल्याणा तील अवलिया कडून नववर्षाचे अनोखे स्वागत
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  थर्टीफर्स्ट अर्थातच नववर्ष म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्या जंगी पार्ट्यानयनरम्य रोषणाईफटाक्यांची आतिषबाजी. गेल्या काही वर्षांत नविन वर्षाच्या सेलिब्रेशनचा हा जणू काही अघोषित नियमच झाला आहे. मात्र या क्षणभंगुर आणि भौतिक देखाव्यात न रमता कल्याणातील एक अवलियाने नववर्ष स्वागताचा असा अनोखा पायंडा पाडला आहे. सुशांत करंदीकर असं या अवलियाचे नाव असून त्यांनी नववर्षानिमित्त २००१ पासून गेल्या २०  वर्षांमध्ये महाराष्ट्रातील थोडे थोडके नव्हे तर तब्बल १०० अवघड किल्ले सर केले आहेत आणि तेही सायकलवरून.


 सह्याद्री सायकल मोहिमेंतर्गत सुशांत यांनी सायकल घेऊन महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांचा माथा गाठला आणि नववर्षाचे अत्यंत वेगळ्या पद्धतीने स्वागत केले. यंदाच्या नववर्षाचे स्वागत स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगडासह घोसाळगडतळागडमानगडावर करण्यात आले. विशेष म्हणजे सह्याद्री सायकल मोहिमेतील हा १०० वा किल्ला होता. ज्यामध्ये सुशांत करंदीकर यांच्यासह कृष्णा नाईकदीपाली कंपालीदिवाकर भाटवडेकरवरद मराठेचिन्मयी ढवळेमन नाईक  आणि दैविक कंपाली हे सर्व वयोगटातील सहभागी झाले होते. या सर्वांनी तब्बल २९० किलोमीटर सायकल प्रवास करत ही ४ गडकिल्ल्यांची मोहीम पूर्ण करण्यात आल्याचे सुशांत करंदीकर यांनी सांगितले.


तर आतापर्यंत सुशांत करंदीकर यांनी राजगडपन्हाळगडविशाळगडकळसुबाईनाणेघाटलोहगडविसापूरतिकोना अशा अनेक महत्वपूर्ण किल्ल्यांचा समावेश आहे. ज्यामध्ये अनेक छोटेखानी आणि सागरी किल्ल्यांवर सायकलवरून चढाई करण्यात आली आहे. गेल्या २० वर्षांपासून सातत्याने ही मोहीम राबविण्यात येत असून विदेशाप्रमाणे आपल्याकडेही 'माऊंटन बायकिंग'चा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठीही आपण हा खटाटोप करीत असल्याचेही करंदीकर यांनी यावेळी सांगितले. 
२०वर्षांत सायकल वरून तब्बल १०० किल्ल्यांवर चढाई कल्याणा तील अवलिया कडून नववर्षाचे अनोखे स्वागत २०वर्षांत सायकल वरून तब्बल १०० किल्ल्यांवर चढाई कल्याणा तील अवलिया कडून नववर्षाचे अनोखे स्वागत Reviewed by News1 Marathi on January 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads