Header AD

टीसीएलचे एसी बाजार पेठेतील हिस्सा वाढविण्याचे लक्ष्य


टीसीएल कनेक्ट डीलर मीटचे केले आयोजन....


मुंबई, २५ जानेवारी २०२१ : टीसीएल या दुस-या क्रमांकावरील जागतिक टेलिव्हिजन ब्रँडने अत्याधुनिक टीव्ही सीरिज आणि इन्व्हर्टर टेक्नोलॉजीवर आधारीत स्मार्ट एअरकंडिशनर भारतीय बाजारात सादर करत आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. भारतातील टीव्ही बाजारपेठेत आपला ठसा उमटविल्यानंतर एसी सेगमेंटमध्येही स्वतःची छाप पडण्याचा कंपनीचा उद्देश आहे. याच अनुषंगाने नुकतेच टीसीएल कनेक्ट डीलर मीटचे आयोजन करण्यात आले होते. यात ८० पेक्षा जास्त एसी टेक्निशियन्स, ११० पेक्षा जास्त डीलर्स व आरएलएफआर पार्टनर्स सहभागी झाले होते.


टीसीएल इंडियाचे वरिष्ठ मार्केटिंग मॅनेजर विजय कुमार मिक्किलीनेनी म्हणाले, “टीव्ही सेगमेंटमध्ये अग्रगण्य ब्रँड झाल्यानंतर आम्हाला एसी सेगमेंटमध्ये ही हीच कामगिरी करायची आहे. आमचे स्मार्ट एअरकंडिशनर्स अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेले असून २०२१ एसी लाइनअप ही आरोग्य, आरामदायी आणि टीकाऊपणा यावर अवलंबून आहे. आता ग्राहकांना किफायतशीर दरात अधिक चांगला अनुभव घेत स्वत:चे घर स्मार्ट घरात रुपांतरीत करता येईल..”


टीसीएलचे स्मार्ट एसी कमी पॉवर इम्पॅक्टसाठी जीडब्ल्यूपीसह येतात. जास्तीत जास्त आरपीएमवर चालतात, जेणेकरून १८ अंशांपर्यंत तापमान ३० सेकंदात कमी होते. टीसीएल अल्ट्रा-इन्व्हर्टर कंप्रेसर हाय फ्रिक्वेन्सीवर सुरु होते आणि जास्तीत जास्त आरपीएमवर चालत २७ पासून १८ अंशावर तापमान केवळ 30 सेकंदात कमी करते. यासह अत्याधुनिक पीसीबी कुलिंग तंत्रज्ञानाद्वारे, ६० अंश सेल्सियसपर्यंतचे सभोवतालचे तापमान थंड होण्याची सुनिश्चिती होते.

टीसीएलचे एसी बाजार पेठेतील हिस्सा वाढविण्याचे लक्ष्य टीसीएलचे एसी बाजार पेठेतील हिस्सा वाढविण्याचे लक्ष्य Reviewed by News1 Marathi on January 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads