फुटबॉल स्पर्धेत कल्याण सॉकरला विजेतेपद क्रीडा स्पर्धाना करोना नंतर सुरुवात
कल्याण , कुणाल म्हात्रे : गेले नऊ ते दहा महिने कोरोनामुळे बंद असलेले क्रीडक्षेत्र पुन्हा नव्याने जोमात सुरू होतानाचे चित्र पहावयास मिळत असून कोरोणा कालावधीनंतर प्रथमच स्पोर्ट्स केअर फाउंडेशन यांच्या वतीने स्वर्गीय यशवंतराव ओंबासे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या इंटर क्लब फुटबॉल स्पर्धत १४ वर्षाखालील मुलांच्या गटात कल्याण सॉकर क्लब ने उल्हासनगरच्या एलिट सोकर चा ०-१ असा पराभव करत स्पर्धेचे अंतिम विजेतेपद पटकावले.
तर १६ वर्षाखालील मुलांच्या गटात उल्हासनगरच्या गोल्डन सॉकर ने कल्याण सॉकर चा पेनल्टी शूट वर ०-१ असा पराभव करत विजेतेपद पटकावले. १४ वर्षाखालील गटामध्ये बेस्ट प्लेयर म्हणून तेजस भडांगे व जितेन डिंगरेजा यांना तर १६ वर्षा खालील गटात बेस्ट प्लेयर म्हणून गंधर्व पुसलकर व अनमोल पाल यांना गौरवण्यात आले. मोहित बजाज व अमित यांनी काम पाहिले. तर स्पर्धा करण्यासाठी मितेश जैन, शशीपाल वर्मा, अरुण कांजीलाल, पार्थ त्रिवेदी, गणेश भंडारी यांनी मेहनत घेतली.

Post a Comment