तीर्थक्षेत्र अकलोली येथील तानसा नदीचे पाणी दूषित डुक्कर फॉम बंद करण्याची मागणी
भिवंडी , प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील सुपरिचित गणेशपुरी, वज्रेश्वरी, अकलोली हे जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते, या गावाना पाणी पुरवठा करणाऱ्या अकलोली गाव येथे तानसा नदी किनारा लागत प्रादेशिक पाणी पुरवठा करणाऱ्या योजने जवळ मुंबई च्या एका व्यावसायिकाने डुक्कर फार्म टाकल्याने ,व तेथेच डुकराचे मलनिस्सारण व उत्पादन होत असल्याने या नदीचे पाणी दूषित झाले असल्याने येथिल डुकर फार्म त्वरित स्थलांतरीत करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणेशपुरी विभाग अध्यक्ष सुनिल देवरे यांनी भिवंडी चे तहसीलदार यांच्या कडे केली आहे.
भिवंडी तालुक्यातील अकलोली येथील वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली या परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा नदी किनाऱ्यावर असलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा लगतच मुंबई येथील एका व्यावसायिकाने अकलोली ग्रामपंचायत हद्दीत डुक्कर फार्म टाकला आहे, त्यामुळे पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात घाणीचे व दुर्गंधी चे साम्राज्य पसरले आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डुकराचे प्रजनन,पालन पोषण संगोपन करून, त्याची कत्तल होऊन सदर मांस हे विक्री साठी मुंबईत नेले जाते, त्यात संताप जनक प्रकार म्हणजे या ठिकाणी जी डुकरे मारली जातात ती येथील नदीच्या पात्र कडेला च शोष खड्यात टाकली जातात व गावातील भटके कुत्रे हे मांस घेऊन गावभर फिरत असतात त्यामूळे या ठिकाणी प्रचंड घाणीचे, व दुर्गंधी चे साम्राज्य पसरले आहे.
या डुकर फार्म चे मल मूत्र व मांस हे येथील तानसा नदीत जात असून तेच पाणी पाणीपुरवठा योजने अंतर्गत तिन्ही गावांना पुरवले जाते त्यात येथील पाणी पुरवठा योजने ला फिल्टर नसल्याने दूषित पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे, भविष्यात गभीर साथीचा आजार पसरू नये व येथील जनते चे आरोग्य धोक्यात येण्या आधीच प्रशासनाने या डुकरं फार्म वर कारवाई करावी अशी मागणी मनसेचे येथील गणेशपुरी विभाग अध्यक्ष सुनिल देवरे यांनी केली आहे या बाबत भिवंडी चे तहसीलदार अधिक पाटील यांनी नदीचे पाणी दूषित करणाऱ्या सदर फार्म हाऊस ची लवकरच सखोल चौकशी करून कडक कारवाई केली जाईल असे सांगितले
तीर्थक्षेत्र अकलोली येथील तानसा नदीचे पाणी दूषित डुक्कर फॉम बंद करण्याची मागणी
Reviewed by News1 Marathi
on
January 05, 2021
Rating:

Post a Comment