Header AD

पेट्रोल दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचा सायकल मोर्चा शेकडो सायकल स्वारांना ठाण्यातच अडवले


केंद्रीय मंत्र्यांना ठाण्यात अडवणार - परांजपे ,मोदींनी जनतेला महागाईने मारले - शेख ....


ठाणे , प्रतिनिधी  :-  लॉकडाऊनपासून आतापर्यंत सुमारे अकरा वेळा इंधनाच्या दरामध्ये वाढ झाली आहे. कोरोनामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आलेला असताना इंधनाच्या दरवाढीमुळे महागाईत वाढ होऊन सामान्यांना जगणे नकोसे झाले आहे. भाजपच्या महाराष्ट्रातील पुढार्‍यांना ही दरवाढ दिसत नाही, असा आरोप करीत देवेंद्र फडणवीस यांनाच निवेदन देऊन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंधन दरवाढ कमी करण्यासाठी विनंती करावी, या मागणीसाठी ठाण्यातील शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सायकल मोर्चा काढला. मात्र, ठाणे पोलिसांनी या मोर्चेकर्‍यांना नितीन कंपनी सिग्नल  येथेच अडवून ताब्यात घेतले.  


अच्छे दिनचे स्वप्न दाखवित केंद्रात सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशात महागाईचा आगडोंब उसळविला आहे. पेट्रोल पंप म्हणजे ‘मोदी वसुली केंद्र’ झाले आहेत. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी ठाण्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीचे युवा प्रदेशाध्यक्ष महेबून शेख, शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठाणे युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली सायकल मोर्चा काढण्यात आला.   
पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला असून, सध्या पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केल्यामुळे पेट्रोलियम कंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल करीत असतात.  पेट्रोलची मूळ किंमत कमी असताना जास्त दराने विक्री करून जनतेची आर्थिक लूट केली जात आहे. 


रोजच्या रोज दरवाढ करण्याऐवजी तीन महिन्यांनी दरांमध्ये फरक करावा. पेट्रोल-डिझेलचे इतर कर काढून वस्तू व सेवा कराच्या कार्यकक्षेत घ्यावे, तसेच महाराष्ट्र व लगतच्या राज्यातील पेट्रोल-डिझेलची किंमत एकसमान करावी अशा मागण्या अनेकवेळा करण्यात आलेल्या असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात केंद्र सरकार माहिर झाले आहे. आजवर केलेल्या आंदोलनांची निवेदने जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून पंतप्रधानांना पाठविण्यात आलेली आहेत. मात्र, त्यांची दखल घेतली जात नसल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे ते मुंबई भाजप प्रदेश कार्यालय असे सायकल मोर्चाचे नियोजन केले होते. या मोर्चासाठी राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख हे उपस्थित होते. 
यावेळी सुमारे 500 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयापासून मुंबईच्या दिशेने सायकल चालवित कूच केले. या आंदोलनात युवकांसह युवती, महिलांचाही मोठा सहभाग होता. मात्र, नितीन कंपनी जंक्शन जवळ पोलिसांनी मोर्चेकर्‍यांना अडवून पुढे जाफ दिले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तिथेच जोरदार घोषणाबाजी करीत रस्ता अडवून धरला. 


यावेळी मेहबूब शेख यांनी सांगितले की, बहोत हो गयी महंगाई की मार.. अशी घोषणा देत  मोदी सरकार सत्तेवर आले आहे. याच मोदी सरकारने सामान्यांचे जगणे अवघड करुन ठेवले आहे. सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा घालण्याचा प्रकार मोदी सरकारने केला आहे. क्रूड ऑईलच्या किमती कमी झालेल्या असतानाही इंधनाचे दर वाढवून मोदी सरकार सामान्यांचे कंबरडे मोडत आहे. भविष्यात जर हे दर कमी केले नाही. तर केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही. 


तर, आनंद परांजपे यांनी  ज्यावेळी क्रूड तेलाच्या किमती वाढलेल्या होत्या तसेच साठवण क्षमता कमी होती. तेव्हा म्हणजे आघाडी सरकारच्या काळात इंधनाचे दर आवाक्यात होते. मात्र आता क्रूड तेलाच्या किमती कमी झालेल्या असताना तसेच साठवण क्षमता वाढलेली असतानाही इंधनाचे दर दररोज वाढतच आहेत. आज रोजी पेट्रोलचे  दर 91.18 रूपये तर डिझेलचे दर 81.44 रुपयांवर गेले आहेत.  इंधनाचे दर कमी करण्यासाठी अनेकदा निवेदने दिली आहेत. मात्र, केंद्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही. म्हणूनच मोदी साहेबांचे विश्वासू शिलेदार म्हणून आम्ही आपणालाच साकडे घालत आहोत. जर, हे दर कमी केले नाहीत; तर, ठाण्यात एकाही केंद्रीय मंत्र्याला येऊ देणार नाही, असा इशारा दिला.
युवाध्यक्ष विक्रम खामकर यांनी, गोरगरीबांच्या पोटावर पाय आणण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत आहे. मोदी सरकार केवळ भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेत असून त्यांच्यामुळेच या देशात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र, आता देशातील युवा वर्ग एकत्र येत आहे. मोदींचे भांडवलशाही धोरण युवक हाणून पाडतील, असे सांगितले.


या आंदोलनात  प्रदेश चिटणीस तथा नगरसेवक सुहास देसाई, नगरसेवक अशरफ पठाण (शानू), युवक अध्यक्ष विक्रम खामकर, माजी युवक अध्यक्ष मंदार केणी, महिला कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष कैलास हावळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विरु वाघमारे, सचिन पंधारे, राजु चापले, जतीन कोठारे, अ‍ॅ्ड. विनोद उतेकर, रमेश दोडके, दिलीप नाईक, परिवहन समिती सदस्य नितीन पाटील, मोहसीन शेख, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, सलीम पटेल, विधानसभा कार्याध्यक्ष महेंद्र पवार, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, रत्नेश दुबे, निलेश फडतरे, निलेश कदम, विशाल खामकर, विलास पाटील, ब्लॉक कार्याध्यक्ष कौस्तुभ धुमाळ, संताजी गोळे, किशोर चव्हाण, तुकाराम गायकवाड, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, संदिप जाधव, सचिव शिवा कालु सिंह, लगबीर सिंग गील, अजित सावंत, शेखर भालेराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी प्रविण सिंग, संजीव दत्ता, संकेत नारणे, युवक विधानसभा अध्यक्ष अभिषेक पुसाळकर, ब्लॉक अध्यक्ष रोहित भंडारे, संदिप येताळ, निखिल तांबे, विधानसभा कार्याध्यक्ष दिनेश बने, के. पी. अहद, सरचिटणीस सौरभ वर्तक, समीर नेटके, वॉर्ड अध्यक्ष निहार नलावडे, साहील तिडके, वागळे उपाध्यक्ष दिपक मोरे, निलेश जाधव, वॉर्ड अध्यक्ष किरण माने, मिलिंद डोंगरे, नितीन पोटफोडे, हेमंत बनसोडे, संजय साळुंखे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पेट्रोल दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचा सायकल मोर्चा शेकडो सायकल स्वारांना ठाण्यातच अडवले पेट्रोल दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचा सायकल मोर्चा शेकडो सायकल स्वारांना ठाण्यातच अडवले Reviewed by News1 Marathi on January 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads