Header AD

निवृत्त बँक अधिकाऱ्यांच्या घरात दरोड्यातील फरार महिला जेरबंद
डोंबिवली , शंकर जाधव   :  डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनजवळील सुरजमनी इमारतीतीत राहणारे निवृत्त बँक अधिकारी अशोक गिरी यांच्या घरी ५ तारखेला सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दरोड्याची घटना घडली होती. या घटनेत विष्णूनगर पोलिसांनी १२ तासात दरोड्यातील तीन आरोपींना अटक केली. तर या दरोड्यात सामील झालेल्या फरार महिलेला पोलिसांनी रविवारी सकाळी अटक केली.चंद्रिका ठाकरसीभाई परमार ( ३२ ) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.चंद्रिका हि मीरा रोडला इजा चाळीत राहते.दरोडा पडल्यानंतर ती फरार झाली होती. 


विष्णूनगर पोलिसांनी दरोड्यातील अटक आरोपीकडून महिलेची माहिती घेतली. चंद्रिका कल्याणला असल्याची माहिती मिळताच विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वपोनि संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बडणे,पोलीस नाईक कुरणे,पोलीस शिपाई कुंदन भांबरे, मनोज बडगुजर आणि भगवान सांगळेयांनी सापाला रचला. चंद्रिका कल्याणला आली असता पोलिसांनी तिला अटक केली.


चंद्रिका ही मुकवणी याची नातेवाईक आहे.कल्याण सत्र न्यायालयात पोलिसांनी चंद्रिकाला हजर केले असता तिला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. विष्णूनगर पोलिसांनी या दरोड्यातील चेतन रजनीकांत मुकवाणी ( ३८, रा. ठाणे-रघुवीरनगर ), दिनेश जयस्वाल रावल ( ४२,रा.डोंबिवली सुरजमनी इमारती ) आणि ठाकुर्ली येथील रिक्षाचालक ( ४९ ) असे तिघा दरोड्याला अटक केली होती.

निवृत्त बँक अधिकाऱ्यांच्या घरात दरोड्यातील फरार महिला जेरबंद निवृत्त बँक अधिकाऱ्यांच्या घरात दरोड्यातील फरार महिला जेरबंद Reviewed by News1 Marathi on January 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads