Header AD

भटक्या प्राण्याना मायेची ऊब देणाऱ्या प्राणीमित्र दीप्ती देशमुख यांची नोंद एशिया बुक आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद
भिवंडी ,  प्रतिनिधी  :  भिवंडी शहर व ग्रामीण भागांत 
गेल्या २६ वर्षांपासून रस्त्यावरील बेवारस भटक्या मुक्या प्राण्यांवर उपचार आणि त्यांचे संगोपन करणाऱ्या दिप्ती देशमुख यांच्या कामाची दखल एशिया बूक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने घेत त्यांना या बाबतचे प्रमाणपत्र नुकताच  धामणकर नाका येथील मेडिकल असोशियनच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रदान करून त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव केला आहे . 
          

योगा शिक्षिका असणाऱ्या दीप्ती या आपल्या वृद्ध आई सोबत भिवंडीत राहत असताना त्यांना लहानपणा पासून मुक्या प्राण्यांची आवड असतानाच रस्त्यावर भटकणाऱ्या भटक्या बेवारस कुत्री मांजरे यांच्यावर लक्ष केंद्रित करून काम करण्यास सुरुवात केली व पाहता पाहता तब्बल २६ वर्ष हे सेवाकार्य अविरत सुरू असून दरम्यानच्या लॉक डाऊन काळात सर्व हॉटेल चायनीज हातगाड्या धाबे बंद असल्याने या भटक्या प्राण्यांवर उपासमारीची वेळ आली असताना तब्बल तीन महिने दीप्ती देशमुख यांनी फिरून या मुक्या प्राण्यांची भूक भागविण्याचे काम केले आहे .


 त्यांच्या या सेवकार्याची दखल विविध सामाजिक संस्थानी घेतली असतानाच बिग बी अमिताभ बच्चन यांनी सुद्धा त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे . त्यांचे हे सेवाकार्य त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला असून तब्बल २६ वर्ष रस्त्यावरील आजारी जखमी भटकी कुत्रे,मांजर,चिमणी,कावळे,कबुतरे, गाढव,बकरी गरुड यांच्यावर स्वखर्चाने उपचार केले आहेत.तर रोज सुमारे तीनशेहून अधिक कुत्र्यांना बिस्किटे खाऊ घालत आहेत.त्यांनी आतापर्यंत २० हजारहून अधिक अंध,अपंग आणि अंगात किडे पडलेल्या कुत्र्यांचे उपचार करून त्यांना बरं केले आहेत.


त्यांच्या या कार्याची दखल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली असून नुकताच भिवंडीत एका कार्यक्रमात एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे अधिकारी मनोज ततवादी आणि अमिताभ बच्चन यांचे वैयक्तिक छायाचित्रकार परेश मेहता यांच्या हस्ते दीप्ती देशमुख यांना सदर रेकॉर्डचे प्रमाणपत्र,मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी भिवंडी शहरातील विविध मान्यवर, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भटक्या प्राण्याना मायेची ऊब देणाऱ्या प्राणीमित्र दीप्ती देशमुख यांची नोंद एशिया बुक आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद भटक्या प्राण्याना मायेची ऊब देणाऱ्या प्राणीमित्र दीप्ती देशमुख यांची  नोंद एशिया बुक आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद Reviewed by News1 Marathi on January 31, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads