Header AD

भिवंडीत ग्राम पंचायत मतमोजणी साठी तयारी पूर्ण

 भिवंडी ,  प्रतिनिधी   :  शुक्रवारी पार पडलेल्या भिवंडी तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीं साठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून ,त्यासाठी मतमोजणीच्या कर्तव्यावर असणारे अधिकारी कर्मचारी यांची नुकताच बैठक घेऊन त्यामध्ये तहसीलदार अधिक पाटील यांनी मार्गदर्शन केले .भादवड येथील स्व.संपदा नाईक सभागृहात तळ मजला अधिक एक मजली सभागृहात सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार असून त्यासाठी एकूण २५ मतमोजणी टेबल असणार आहेत .ग्रामपंचायतींच्या प्रभाग निहाय मतमोजणीचा कार्यक्रम सुनिश्चित केला असल्याने दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व ग्राम पंचायतीचा निकाल जाहिर होतील असे  तहासिलदार अधिक पाटील यांनी सांगितले .या मार्गदर्शन बैठकीस तहासिलदारां व्यतिरिक्त महसूल ,पंचायत समिती अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
भिवंडीत ग्राम पंचायत मतमोजणी साठी तयारी पूर्ण भिवंडीत ग्राम पंचायत मतमोजणी साठी तयारी पूर्ण Reviewed by News1 Marathi on January 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads