हाजी मलंगवाडी ग्रुप ग्राम पंचायतीवर एच.एम.बी. सरकार पॅनलचे वर्चस्व
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण नजीक असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील हाजीमलंगवाडी ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सर्व जागांसाठी चुरशीची लढत झाली. या अटीतटीच्या लढतीत मलंगगडावरील तीन जागांवर अब्दुल भाई बाबाजी यांच्या एच.एम.बी. सरकार पॅनलचे तिन्ही उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये विशाल शिवराम खोत, रिहाना जाकीर सय्यद आणि बबरु नवाब शेख यांच्या समावेश आहे.
मलंगगडाचा विकास करण्यासाठी एच.एम.बी. सरकार पॅनलच्या माध्यमातून अब्दुल भाई बाबाजी यांनी उमेदवार दिले होते. निवडणुकीत त्यांनी दिलेल्या आशीर्वादामुळेचे हाजी मलंगगडावरील हे तीन उमेदवार आणि गडाच्या परिसरातील इतर सर्व उमेदवार देखील निवडून आले आहेत. या सर्व विजयी सदस्यांना एकत्र घेऊन आगामी काळात मलंगगड या तीर्थक्षेत्राचा जास्तीत जास्त विकास करून, येणाऱ्या भक्त मंडळी आणि पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच पुढच्या महिन्यात मलंगगडाची यात्रा असून या यात्रेवेळी देखील कोरोना पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेऊन हि यात्रा पार पाडण्यात येणार असल्याची माहिती अब्दुल भाई बाबाजी यांनी दिली.

Post a Comment