बल्याणी वन जमिनीवरील अनाधिकृत मोबाईल टाँवरवर कारवाईची मागणी
कल्याण , कुणाल म्हात्रे : बल्याणीतील महाराष्ट्र शासन वन विभागाच्या जागेत दोन मोबाईल टाँवर उभे करण्यात आले असुन मोबाईल कंपनीला जागा भाडेतत्वावर देत मोबदला घेत असल्याचा आरोप वन आधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करीत या प्रकरणाची चौकशी व कारवाई ची मागणी मोहेली येथील रहिवाशाने केली आहे. बल्याणी परिसरात वनखात्याच्या जागेत भुफियांनी अनाधिकृत चाळी बांधुन रूम विकले.
वन खात्याने कारवाईचा बडगा उचलीत वन खात्याच्या जागेतील अनाधिकृत रूम निष्कासन कारवाईत भुईसपाट केली. यामध्ये गरीब मध्यम वर्गीय बेघर झाले. असे असताना देखील बल्याणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात जी. ओ. कंपनीचे दोन टाँवर उभे केलेले आहे. संदर्भीत ठिकाणी उभ्या रहिलेल्या टाँवरची जागा ही महाराष्ट्र शासन वन विभाग कार्यालयाची असुन विनायक भगत यांनी जी .ओ. कंपनीला सदर जागा, जमीन ही त्यांच्या मालकीची असल्याचा बनाव करून जमिनीवर वन विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता दोन अनाधिकृत मोबाईल टाँवर उभे केले आहेत.
जी.ओ. कंपनीशी करार करून जागेचे भाडे घेत भाजपा पदाधिकारी विनायक भगत यांनी महाराष्ट्र शासन आणि जी. ओ. कंपनीची फसवणूक केलेली आहे. याची चौकशी करत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी हेमंत अंबारे यांनी निवेदनाद्वारे वन विभाग अधिकारी कल्याण यांच्याकडे केली आहे.या बाबत वन विभाग कल्याणच्या वन अधिकारी कल्पना वाघिरे यांच्याशी संपर्क साधला असता सदरच्या तक्रारीची दखल घेतली असून मोबाईल टॉवरच्या जीओ कंपनीशी झालेल्या कराराचे कागदपत्र मागविली असून येत्या काही दिवसात या बेकायदेशीर मोबाईल टॉवर वर कारवाई केली जाईल असे सांगितले.

Post a Comment