Header AD

खडवली नजीक रेल्वे फाटक क्रॉसिंगच्या रस्त्याची दुरावस्था

 
कल्याण , कुणाल  म्हात्रे   :-   खडवली स्टेशन नजीक कल्याणच्या आणि कसा-या च्या दिशेने असणा-या खडवली ५५-सी  रेल्वे फाटकातील क्रॉसिंग रोड  रस्तात्यांची अवस्था दयनीय झाली असुन या खराब रस्त्यांमुळे अनेकवेळा वाहने अडकून पडत आणि त्यामुळे वाहने पासिंगला अडथळे निर्माण होत आहे.


     त्याचप्रमाणे याच खराब रस्त्यामुळे अनेक वेळा ट्रक अडकून रेल्वे  वाहतुकी विस्कळीत झाल्याचाही घटना     वारंवार घडलेल्या आहेत. अश्यावेळी एखादी तातडीच्या रुग्णाची रुग्णवाहिका अडकून पडल्यास एखादा जीवही गमावला जाऊ शकतो.  नडगांव, खडावली, पितांबरे पाडा, चिंचवली, राया या गावाकडुन  ये जा करणाऱ्या वाहनांना या खडवली ५५-सी रेल्वे क्राँसिंग फाटकातील वर खाली असणारे फेव्हर ब्लाँक व खराब रस्ता हा अडथळा होत आहे.   या गंभीर बाबींकडे गांभीर्याने पाठपुरावा करण्यासाठी नडगाव ग्रामपंचायत  सदस्य शेखर लोणे हे रेल्वे प्रशासनाकडे पत्र देऊन खडवली स्टेशन नजीक असलेल्या खडवली ५५- सी रेल्वे फाटकातील रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी करणार असल्याचे  त्यांनी सांगितले
खडवली नजीक रेल्वे फाटक क्रॉसिंगच्या रस्त्याची दुरावस्था खडवली नजीक  रेल्वे फाटक क्रॉसिंगच्या रस्त्याची दुरावस्था Reviewed by News1 Marathi on January 31, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads