मूकबधीर असल्याचा बहाणा करून घरात घुसून चोरी डोंबिवली पूर्वेकडील सुदर्शन नगर मधील घटना..
डोंबिवली , शंकर जाधव : डोंबिवली पश्चिमेकडील दरोड्याची घटना ताजी असताना डोंबिवली पूर्वेकडील एका सुदर्शननगर येथे एका इमारतीतील रहिवाशी अभिजित गाडे यांच्या घरी एक अज्ञात घरात घुसून घरातील पर्स,काही पैसे आणि मोबाईल चोरत होता इतक्यात बेडरूममधून हॉल मध्ये आलेल्या गृहिणीने त्याला पहिले. आपण पकडले जाऊ या भीतीने चोरट्याने पळ काढला.मात्र इमारतीच्या खाली सीसीटीव्ही नसल्याने त्याची ओळख पटू शकली नाही.
या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान इमारतीतील एका रहिवाश्याने इमारीतीत आलेले चोर मूकबधीर असल्याचा बहाना करून आला होता.भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब यांनी सदर घटनेची माहिती मिळताच गाडे याच्या घरी गेले.इमारतीतील रहिवाश्यांना परब यांनी या ठिकाणच्या चारही इमारतींना सीसीटीव्ही कॅमेरे देण्याचे आश्वासन दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेकडील सुदर्शननगर आर- ९ येथील स्टलिंग को- आॅप.हौसिंग सोसायटीच्या दुसर्या मजल्यावर अभिजित गाडे हे पत्नी व मुलाबरोबर राहतात.या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक २५ -२६ वायोगातील एका तरून मुकबधीर बनून रमेश राणे यांच्या घरासमोर आला.मुकबधीर असल्याचे हाताच्या इशाऱ्याने दाखवत मदत मागितली.
जोशी यांच्या पत्नी घरात गेल्यावर चोरटा दुसऱ्या मजल्यावर रहाणाऱ्या गाडे याच्या घरासमोर आला. गाडे यांच्या घरातील दरवाजा अर्धा उघडा असून तरी सेफ्टी दरवाज्याला आतून कडी लावली होती. चोरट्याने घरातील हॉलमध्ये कोणी नसल्याचे पाहून सेफ्टी दरवाज्याच्या आत हात घालून दरवाजा उघडला.अभिजित गाडे, त्याची पत्नी व मुलगा घरातील बेडरूम मध्ये असल्याने घरात कोणी घुसल्याचे समजले नाही.चोरट्याने घरातील टेबलावर ठेवलेले मोबाईल.
काही रक्कम आणि ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, रोख रक्कम दोन हजार रुपये ठेवलेली पर्स चोरली.इतक्यात अभिजित गाडे यांची पत्नी प्राजक्ता यांना घरातील दार उघडे कसे याचा संशय आला.त्या लगेच हॉल मध्ये गेल्यावर चोरट्याने पकडले जाऊ या भीतीने घरातून पळ काढला.इमारतीतील रहिवाशी जोशी यांनी सांगितले कि, चोरटा काही वेळापूर्वी समोरच्या इमारतीत गेला होता.एका घरात आजी दिसल्या आणि त्यांनी घरात घुसण्याच्या प्रयत्न केला. मात्र आजीने हिम्मत दाखवत अनोळखी इसम घरात घुसल्याचे पाहून चोरट्याच्या दिशेने वस्तू फेकली. त्यामुळे चोरट्याने त्या घरातून पळ काढून आमच्या इमारतीत आला.दरम्यान भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब यांनी गाडे यांच्या घरी जाऊन परिस्थतीची महिती घेतली.शहरात असे प्रकार वाढू नये म्हणून रहिवाश्यांनि सर्तक राहिले पाहिजे असे परब यांनी सांगितले.
चौकट
१ ) सुदर्शननगर परिसरात पोलीस चौकीची मागणी...
पोलिसांनी सुदर्शन नगर आणि निवासी भागात गस्ती वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. सुदर्शननगर आर- ९ येथील स्टलिंग को- आॅप.हौसिंग सोसायटीत राहणारे आकाशवाणीतील निवृत्त अधिकारी शशिकांत कासारे यांनी सुदर्शननगरपरिसर आणि रेसिडेन्सी विभागातील घरात चोरी आणि रस्त्यावरून पायी चालणाऱ्या नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी घटना घडू नये म्हणून `पोलीस चौकी` असावी अशी मागणी केली आहे.
२) डोंबिवलीकरांनी सावध रहा,इमारतीच्या आवारात संशयास्पदरित्या घुटमळणाऱ्या व्यक्तीची माहिती पोलिसांना द्या..
अनेकवेळेला इमारतीच्या आवारात, आजूबाजूला एखादी व्यक्ती संशयास्पदरित्या घुटमळणाताना दिसतात.अश्या वेळी रहिवाश्यांनी सतर्क राहिले पाहिजे.इमारतीत सीसीटीव्ही कॅमरे लावा,घरातील दरवाज्याला सेफ्टी दरवाजा लावा, अनोळखी व्यक्ती दिसल्यास त्याला घरात घेऊ नका.शक्य झाल्यास इमारतीच्या सोसायटीने वॉचमन ठेवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Post a Comment