भिवंडीत बेपत्ता युवकाचा छिन्न विच्छिन्न मृतदेह आढळला ,निर्घृण हत्येचा गुन्हा
भिवंडी , प्रतिनिधी : भिवंडी शहरातील घुंगट नगर परिसरातील भंगार व्यावसायिक कृष्णा केशरवाणी वय २८ हा शुक्रवार दि.२५ डिसेंबर पासून बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह तालुका पोलीस ठाणे हद्दीतील चाविंद्रा येथे निर्जन स्थळी आढळून आला असून मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत असल्याने सर्वांनीच हळहळ व्यक्त केली आहे .
कृष्णा केशरवाणी उर्फ टोनी हा घुंगट नगर येथून भंगार खरेदी करण्यासाठी आपल्या सोबत २० हजार रुपये घेऊन शुक्रवारी संध्याकाळी ५ वा घरा बाहेर आपली दुचाकी घेऊन पडला तो घरी परातलाच नाही .त्यानंतर रात्री उशिरा पर्यंत कुटुंबीयांनी त्याचा शोध घेऊन ही तो न सापडल्याने शहर पोलीस ठाण्यात तो हरविला असल्या बाबत नोंद करण्यात आली .त्याचा सर्वत्र शोध सुरू असतानाच तालुक्यातील चिंबी पाडा या आडवाटे च्या रस्त्यावर त्याची दुचाकी आढळून आल्याने त्याच्या घरच्यांची धास्ती वाढली असून त्या चिंतेतून पोलिसांनी आपल्या मुलाचा तात्काळ शोध घ्यावा या साठी कुटुंबियांसह घुंगट नगर येथील शेकडो स्त्री पुरुष यांनी रस्त्यावर एकत्रित होऊन पोलीस उपायुक्त कार्यालया बाहेर जमून रस्त्यावरील वाहतूक अडवून धरत रस्ता रोको आंदोलन सुरू केले .
या दरम्यान शहर पोलिसांना गुप्त बातमीदारा कडून मिळालेल्या माहिती नुसार सोहेल खान या भंगार व्यवसायिकास ताब्यात घेत त्याकडे कसून चौकशी दरम्यान त्याने हत्येची कबुली दिली असून ,सोहेल खान या कडील चोरीचे भंगार कृष्णा केशरवाणी खरेदी करायचा परंतु व्यवहार न पटल्यास पोलिसांना खबर देऊन माझा माल पकडून देऊन आर्थिक नुकसान करायचा या रागातून ही हत्या केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले असून ,त्याने मृतदेह चाविंद्रा गावाच्या हद्दीत यंत्रमाग कारखान्याच्या पुढे असलेल्या निर्जन ठिकाणी मृतदेह मारून टाकल्याचे सांगितल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे व पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी मृतदेहाचे शीर व पायाचे काही अवशेष कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने पोलिसांनी घटनास्थळीच शवविच्छेदन करून मृतदेहाचा व्हीसेरा न्यायिक शवविच्छेदना साठी मुंबई येथे पाठविले असून आरोपी सोहेल खान यास ताब्यात घेत अटक केली आहे .
भिवंडीत बेपत्ता युवकाचा छिन्न विच्छिन्न मृतदेह आढळला ,निर्घृण हत्येचा गुन्हा
Reviewed by News1 Marathi
on
January 01, 2021
Rating:

Post a Comment