Header AD

बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाईची वंचितची मागणी
ठाणे, दि.१२ -  दिवा येथील म्हातर्डी गावात राहणार पांडुरंग शेलार नावाच्या नराधमाने एका ४ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. या विकृत कृत्या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसात तक्रार केल्यावर आरोपी पांडुरंग शेलार याला अटक करण्यात आली आहे.


परंतु  हा घडलेला प्रकार अतिशय विकृत मनोवृत्तीचा असल्याने याबाबत पोलीस प्रशासनाने योग्य ती चौकशी करून सदर नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी वंचित बहुजन आघाडी दिवा विभागाचे अध्यक्ष मिलिंद गवई यांच्या नेतत्वाखालील खाली सहायक पोलीस आयुक्त कळवा यांना निवेदन देण्यात आले. या बाबत सहायक पोलीस आयुक्तांनी लवकरात लवकर तपास पूर्ण करून आरोपीला कठोर शिक्षा होईल असे आश्वासन दिले.


पीडित मुलीवर कळवा येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. रुग्णालयात जाऊन वंचितच्या कार्यकर्त्यांनी पिडीत मुलीला व तिच्या पालकांची भेट घेऊन सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाईची वंचितची मागणी बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाईची वंचितची मागणी Reviewed by News1 Marathi on January 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रुग्णालयाच्या पॅसेज मध्ये ऑक्सिजन लावून रुग्णांवर उपचार

■कल्याण डोंबिवलीत आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्र....   कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  :   रुग्णालयाच्या पॅसेजमध्ये ऑक्सिजन लावून रुग्णांवर उपचार...

Post AD

home ads