Header AD

कोरोना काळातील पत्रकारांचं काम कॊतुकास्पद महापौर नरेश म्हस्के ठाण्यात पत्रकार दिन साजरा.

ठाणे, प्रतिनिधी  :  पत्रकारांनी आतापर्यंत  आपलं वेगळं अस्तित्व नेहमीच जपलं आहें. कोरोनाच्या काळात पत्रकारांनी जी भूमिका बजावली ती कॊतुकास्पद आहें. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेचा पाया रचला. त्यांनी केलेल्या कार्याला तोड नाही. असं वक्तव्य  ठाणे महापालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांनी केलं.यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोरोनाकाळात मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश देण्यात आला.ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, ठाणे जिल्हा पत्रकार  संघ  महापालिका जनसंपर्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी 6 जानेवारीला के. नरेंद्र  बल्लाळ सभागृहात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त महापौर नरेश म्हस्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.माझी सुरवात ही पत्रकार म्हणून झाली होती. त्यामुळे पत्रकारांची मेहनत  पाहिली आहें.कोरोनाच्या काळात पत्रकारांनी ज्या प्रमाणे काम केलं त्याला तोड नाही. असं महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले. तर ठाणे शहर दैनिक पत्रकार संघांचे अध्यक्ष राजेश मोरे यांनी आपल्या भाषणात बोलतांना सांगितले की समाजातील प्रत्येक घटकासाठी पत्रकार रस्त्यावर उतरून काम करीत आहें.कोरोना काळात आमच्या सहकाऱ्यांनी जे काम केलं ते कोतुकास्पद  आहें. असं मोरे यांनी सांगितले. 

यावेळी बोलतांना जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे म्हणाले की  बाळशास्त्री जांभेकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत वर्तमानपत्र सुरु केलं. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आम्ही आज पत्रकारितेचा वसा पुढे नेत आहें. असं पितळे यांनी सांगितलं. यावेळी कोरोनाच्या काळात मृत्यूमुखी पडलेल्या जेष्ठ पत्रकार श्रीकांत नेर्लेकर, प्रशांत कांबळी, विकास काटदरे, अशोक जालनावाला,यांच्या कुटुंबियांना खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्यावतीने एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी  ठाणे शहर दैनिक  पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश मोरे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे,उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार दीपक दळवी यांनी केले.
कोरोना काळातील पत्रकारांचं काम कॊतुकास्पद महापौर नरेश म्हस्के ठाण्यात पत्रकार दिन साजरा. कोरोना काळातील पत्रकारांचं काम कॊतुकास्पद महापौर नरेश म्हस्के ठाण्यात पत्रकार दिन साजरा. Reviewed by News1 Marathi on January 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads