Header AD

तरूणाना,नव्याना संधी मिळाली पाहिजे ना.बाळासाहेब थोरात
ठाणे, प्रतिनिधी  :  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत असताना मंत्री व अन्य महत्त्वाच्या जबाबदा-या आल्या त्यामूळे पक्षाच्या माध्यमातून तरूणांना, नवीन रक्ताच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे या मताचा मी आहे असे वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी शहर मध्यवर्ती काँग्रेस कार्यालयाला भेट दिली असता केले.जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या घरि त्यांच्या कुटुंबियांना भेट द्यायला आज ना.बाळासाहेब थोरात हे ठाण्यात आले होते सदरची भेट झाल्यानंतर ते शहर मध्यवर्ती काँग्रेस कार्यालयास भेट देण्यास आले होते.काॅग्रेस शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी पत्रकाशी बोलताना त्यांनी सांगितले की,महाविकास आघाडी मध्ये आम्हाला आमच्या पक्षाची ताकत वाढविण्यासाठी कार्यरत लावे लागणार आहे त्यामूळे ज्या ज्या वेळी जे निर्णय होतील त्या निर्णयाला आम्ही सर्वांना बंधनकारक आहे.


भा.ज.पा ला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी  योग्य वेळी योग्य निर्णय घेउच असे त्यांनी याप्रसंगी सांगितले, औरंगाबाद नामांतर बाबत बोलताना त्यांनी सांगितले की,महाराजाबद्दल आम्हाला कायमच आदर आहे,आम्ही एकदम स्पष्ट भूमिका मांडली आहे फक्त एखाद्या गोष्टीची परिणाम चुकीच्या पद्धतीने होउ नये एकढीच अपेक्षा आहे असेही त्यांनी बोलताना शेवटी सांगितले या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस व माजी आमदार मोहन जोशी,मनोज शिंदे,शहर काँग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे,प्रदेश काँग्रेस सदस्य राजेश जाधव आदि मान्यवर उपस्थित होते. 
तरूणाना,नव्याना संधी मिळाली पाहिजे ना.बाळासाहेब थोरात तरूणाना,नव्याना संधी मिळाली पाहिजे ना.बाळासाहेब थोरात Reviewed by News1 Marathi on January 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

गरिबीचे नाटक करून लग्न करून ती करायची नवाऱ्यांची फसवणूक , भिवंडीत झाला प्रकार उघड

■फसवणूक करणाऱ्या तीन महिलांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.... भिवंडी दि. १५ (प्रतिनिधी  )  फसवणुकीचा अनेक घटना आपल्या आजूबाजूला नेहमी...

Post AD

home ads