Header AD

भिवंडी तालुक्यातील पाणी प्रश्नावर श्रमजीवी संघटना आक्रमक

 

◆पंचायत समिती भिवंडी येथे गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयातच मांडले ठिय्या आंदोलन बीडीओ सह पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना विचारला जाब....


भिवंडी ,  प्रतिनिधी  :  तालुक्या तील अनेक गाव पाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे,  आदिवासी वाड्या आजही पाण्याशिवाय तळमळत आहेत, अशात वारंवार तक्रारी निवेदन मागणी करूनही प्रशासन कृती करत नसल्याने संतप्त होत श्रमजीवी संघटनेने आज आंदोलन केले. गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे यांच्या दालनात आलेल्या शिष्टमंडळाचे आंदोलनात रूपांतर झाले. 4 तास सुरू असलेल्या या आंदोलनात ठोस कृती कार्यक्रम आणि लेखी पत्र घेऊन आंदोलन थांबविण्यात आले.


पाण्याचे प्रलंबित प्रश्न सोडवावे तसेच जागतिक बँकेच्या योजना ताब्यात घेऊन  बोगस पाणीपट्टी वसुली करणाऱ्या खाजगी लोकांवर गुन्हे दाखल करण्याची संघटनेची मागणी यावेळी केली. शिरोळे ग्रामपंचायत हद्दीत जगातील बँकेच्या जुन्या पाणी योजना गावातील काही खाजगी मंडळींनी हस्तांतरित केल्या आहेत, कोणतेही शासकीय अंकुश नसतात खाजगी माणसं वसुली करतात, याबाबत आज संघटनेने आवाज उठवला, व पोलीस कारवाईची मागणी केली, पंचायत समिती प्रशासनाने पोलिसांना पत्र दिल्याचे लेखी संघटनेकडे सुपूर्द केले.यासह गाणे फिरीग पाडा, मोहिली, कुशिवली, कुरुंद, दलोंडे ,काटइ ,खोनी इत्यादी गावांचे प्रश्न होते. : पाणी पुरवठा विभाग उपअभियंता डी आर कांबळे यांच्या कडे वारंवार निवेदन तक्रार देऊनही कार्यवाही होत नसल्याने संतप्त झालेल्या श्रमजीवी कार्यकर्त्यांनी आज आंदोलन केले. 


यावेळी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा युवक प्रमुख  प्रमोद पवार, जिल्हा शेतकरी प्रमुख संगीता भोमटे,जिल्हा कातकरी प्रमुख जयेंद्र गावित तालुका अध्यक्ष सुनील लोणे, शहर तालुका अध्यक्ष सागर देसक,सचिव जया पारधी,, सचिव मोतीराम नामकुडा ,आशा भोईर,उपाध्यक्ष तानाजी लाहंगे, उज्वला शिंपी, किशोर हुमने, प्रदीप चौधरी, गुरुनाथ जाधव,विजय राऊत, गणपत मते, चंद्रकांत मते  इत्यादीसह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.
भिवंडी तालुक्यातील पाणी प्रश्नावर श्रमजीवी संघटना आक्रमक भिवंडी तालुक्यातील पाणी प्रश्नावर श्रमजीवी संघटना आक्रमक Reviewed by News1 Marathi on January 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads