बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा सातबारा कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या नावावर
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण पश्चिमेतील काळा तलाव येथे कल्याण डोंबिवली महापालिकेने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे देशातील पहिले स्मारक चार वर्षापूर्वी उभारले. या स्मारकाची जागा महापालिकेच्या नावे नव्हती आज बाळासाहेबांच्या जयंतीदिनी ही जागा महापालिकेच्या नावी झाली आहे. या जागेचा सातबारा महापालिकेच्या नावे झाल्याची माहिती शिवसेना नगरसेवक सचिन बासरे यांनी दिली आहे.
आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त काळा तलाव स्मारक येथे आमदार विश्वनाथ भोईर व आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या सहित शिवसेनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.या स्मारकाचे चार वर्षापूर्वी लोकार्पण करण्यात आले असून या स्मारकाची जागा एका खाजगी मालकाची होती. त्याने २० वर्षापूर्वी या जागेचा टीडीआर घेतला होता. मात्र ही जागा आरक्षित असल्याने महापालिकेच्या नावे झाली नव्हती.
Post a Comment