फुले दांपत्यांच्या संघर्षमय प्रवासा मुळेच आम्ही स्त्रिया घडलो डॉ. सुफल वैद्य
■विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सम्राट अशोक विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा सन्मान....
कल्याण , कुणाल म्हात्रे : १ जानेवारी १८४८ ला पुणे येथील भिडे वाड्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा काढली आणि खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्ती मिळाली. फुले दांपत्याच्या संघर्षमय प्रवासामुळेच आम्ही स्त्रिया आता विविध क्षेत्रात कार्यरत आहोत. धावपळीच्या जीवनात आपल्याला नोकरी करून घर सांभाळायचे आहे महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी अशी विविध उदाहरणे देत प्रमुख मान्यवर डॉ. सुफल वैद्य यांनी मार्गदर्शन केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाली भाषा प्रसार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयात डॉक्टर नर्स, व्यावसायिक, तसेच स्पर्धा परीक्षेतून नोकरी मिळालेल्या माजी विद्यार्थिनींचा आम्ही सावित्रीच्या लेकी या घोष वाक्यास समर्पक सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. व्यवसायाने डॉक्टर श्रीजया माने, परिचारिका सविता भवर, कोरोना काळात भाजीपाला विकून मिळालेल्या नफ्यातून कापड दुकान टाकणाऱ्या आरती इंगळे, समुपदेशक कविता सरदार, आणि स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन नोकरी करणाऱ्या विद्या जाधव यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष पी टी धनविजय, माध्य. मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता आठवीची विद्यार्थिनी समीक्षा देविदास परदेशी या विद्यार्थिनीने मी सावित्रीबाई बोलते या एकपात्री अभिनयातून मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी केले तर आभार प्राथ. मुख्याध्यापिका सुजाता नलावडे यांनी मानले. विद्यार्थी व पालकांनी कार्यक्रमाचा ऑनलाईन आनंद घेतला. कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक वर्ग उपस्थित होता.

Post a Comment