आंगणवाडी शिक्षिकांनी बेटी बचाव बेटी पढाओ आभियानाची केली व्यापक जनजागृती
कल्याण, कुणाल म्हात्रे : कल्याणात एकात्मिक बालविकास प्रकल्प नागरी यांच्या काळातलाव येथील आगंणवाडीत कन्यारत्न लाभलेल्या मातांचा "बेटी बचाव बेटी पढाओ" अभियानांतर्गत शुक्रवारी प्रशस्तीपत्र देत सत्कार करण्यात आला. काळातलाव येथील आगंणवाडी त सेविका व मदतनिस यांनी बालविकास प्रकल्प (नागरी)कल्याण जि.ठाणे यांचे प्रकल्प अधिकारी प्रताप पाटील, मुख्यसेविका अस्मिता मोरे यांच्या मार्गदर्शना खाली सोशल डिस्टसिंगचे सगळे नियम पाळत बेटी बचाव बेटी पढाओ अंतर्गत एप्रिल २०२० पासून आत्तापर्यत जन्माला आलेल्या बालिकांच्या माताचे प्रशस्तीत्रक देऊन त्यांनी कन्या रत्नाला जन्मदिला म्हणून त्याचा सत्कार करण्यात आहे.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मुलीच्या जन्माचे कमी होण्याचे जे वाढते प्रमाणआहे ते थांबणे तसेच जसे पुत्र जन्माला आल्यांतर त्याचे स्वागत केले जाते तसेच कन्या रत्नाचे ही झाले पाहीजे. कारण जर असे झाले नाही तर येणाऱ्या पिढीला भावाला बहीण मिळणार नाही आणि मुलाला लग्नासाठी मुलगी मिळणार नाही म्हणूनच जेवढे मुलाचे महत्व आहे तेवढेच मुलीचे आहे. त्याच बरोबर एक मुलगा शिकला की तो एकटाच शिकतो पण एक मुलगी शिकली की पूर्ण कुटूंब साक्षर होते म्हणूनच "बेटी बचाओ बेटी पढाओ" कार्यक्रमाचे आयोजन सेविका शैला महाजन, ज्योती तायडे, सीमा शिंपी, मदतनिस शितल सकपाळ, उर्मिला मोरे, प्रतिभा मोरे यांनी केले होते.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन शिल्पा बावकर यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रकल्पाच्या मुख्यसेविका अस्मिता मोरे, डाँ पकंज उपाध्याय, पूनम उपाध्याय, प्राध्यापक शिवलाल साहू, महंत कमलदास हायस्कुलच्या प्राध्यापिका माधुरी पांडे, तसेच सेजल ठाकूर उपस्थित होत्या. आलेल्या पाहुण्यांनी मातांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. या नंतर उपस्थित असलेल्या काळातलाव विभागातील सर्व सेविका मदतनीसांचे सुध्दा पुष्पगुच्छ वभेटवस्तू देऊन करोनायोद्धा म्हणून सत्कार केला. यानिमित्ताने "बेटी बचाओ बेटी पढाओ" आभियानाची व्यापक जनजागृती आगंणवाडी शिक्षिका, मदतनीस यांनी उपस्थित रहिवाशी महिला वर्गामध्ये केली.

Post a Comment