Header AD

भिवंडीतील स्व. इंदिरागांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार

 

◆व्हेंटिलेटर अभावी सर्पदंश झालेल्या आदिवासी मजुराचा मृत्यू ...


भिवंडी  , प्रतिनिधी   : गौरसोयी व सुविधांचा अभाव अशी ओरड असलेल्या भिवंडीतील स्व इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरच्या अभावाने सर्पदंश झालेल्या एका आदिवासी मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. या घटनेने इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात सोई सुविधांचा उडालेला बोजवारा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 


              विठ्ठल देव कोरडा ( वय ५५ वर्ष , रा. जव्हार ) असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या आदिवासी मजुराचे नाव असून तो आपल्या पत्नीसह कारीवली येथील एका बांधकामावर मजुरीवर काम करत होता. गुरुवारी दुुपारी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी या मजुराच्या पायाला सर्प दंश झाला. येथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यास तत्काळ भिवंडीतील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. मात्र त्यानंतर सायंकाळी मजुराची प्रकृती खालावल्याने त्यास पुढील उपचारासाठी कळवा व मुंबई येथील रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र रुग्णाची प्रकृती जास्त बिघडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.


                कामगाराच्या मृत्यूने उपस्थित नागरिकांनी डॉक्टरांना तुम्ही रुग्णाची प्रकृती जास्त खालावल्या नंतर रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देता, हाच सल्ला जेव्हा आम्ही रुग्णाला दवाखान्यात दाखल केला तेव्हाच दिला असता तर आमचा रुग्ण दगावला नसता असा आरोप या रुग्णासोबत असलेल्या नागरिकांनी रुग्णालयात उपस्थित डाक्टरांवर केला. त्यास प्रतिउत्तर म्हणून येथील कर्तव्यावर उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णावर आवश्यक तेवढे प्राथमिक उपचार योग्य रीतीने करण्यात आले आहेत, मात्र सध्या इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरची सोय नाही सर्व व्हेंटिलेटर हे कोविडसाठी वापरण्यात आल्याने तुमच्या रुग्णाला व्हेंटिलेटर उपलब्ध झाला नाही आणि त्या रुग्णाला व्हेंटिलेटरची अत्यंत आवश्यकता होती त्यासाठी सदर रुग्णास आम्ही पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात दाखल केल्याचा सल्ला दिला अशी प्रतिक्रिया येथील वैद्यकीय अधिकारी डॉ जयश्री डोंगरे यांनी दिली आहे.

 
                तर सदर रुग्णाला सर्प दंशानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्याच्यावर उपचार देखील सुरु होते मात्र काही वेळानंतर रुग्णाचा बीपी वाढला व त्याला आकडी आली कदाचित त्याला ब्रेन ह्यामर सारखा त्रास झाला असावा ज्यात या रुग्णाचा मृत्यू झाला, व्हेंटिलेटर बद्दल बोलायचे झाले तर नॉन कोविड साठी सध्या रुग्णालयात व्हेंटिलेटर सुविधा नाही त्याच बरोबर व्हेंटिलेटर हाताळणारे तज्ञ टेक्निशियन देखील रुग्णालयात नाही अशी प्रतिक्रिया स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेश मोरे यांनी दिली आहे. 
भिवंडीतील स्व. इंदिरागांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार भिवंडीतील स्व. इंदिरागांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार Reviewed by News1 Marathi on January 29, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads