Header AD

सोन्याच्या दरात ०.६ टक्क्यांनी वाढ

 

सुरक्षित मालमत्ता म्हणून सोन्याची मागणी वाढली ~


मुंबई, १३ जानेवारी २०२१ : कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत चिंतादायी वाढ झाल्याने सोन्याला आधार मिळाला तर कच्चे तेल आणि बेस मेटलला मात्र फटका बसत आहे. आर्थिक सुधारणेसाठी अतिरिक्त मदत निधी देण्याच्या दिशेने अध्यक्ष जो बिडेन यांचा पाठींबा मिळाल्याने, सोन्याच्या बाबतीत आणखी सकारात्मक स्थिती निर्माण झाली. ओपेक आणि सहयोगी देशांकडून कच्च्या तेलातील उत्पादनात कपात झाल्याने तेलाच्या किंमतींना आधार मिळाला. चीनमधील काही भागात नव्याने लॉकडाऊन झाल्याने बेस मेटलच्या दरांवर जास्त परिणाम झाला असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.


सोने: अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी कोरोना विषाणूविरोधातील युद्धात मदतीकरिता अतिरिक्त प्रोत्साहनपर पॅकेजला पाठिंबा दिल्याने स्पॉट गोल्डचे दर ०.६ टक्क्यांनी वाढले व १,८४४.७ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. दरम्यान, जागतिक अर्थव्यवस्थेची बिकट होत जाणारी स्थिती आणि विषाणूचा नवा स्ट्रेन आढळल्याने सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याची मागणी वाढली.

तथापि, डेमोक्रेट्सनी अमेरिकी सिनेट निवडणुकीत विजय मिळवल्याने तसेच अमेरिकी कोषागार उत्पन्नातील वाढ आणि अमेरिकी डॉलरची मजबूत स्थिती यामुळे यामुळे सोन्यातील नफ्यावर मर्यादा आल्या. जागतिक आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याच्या आशेने अमेरिकी ट्रेझरी उत्पन्नात अचानक वृद्धी झाली, त्यामुळेही सोन्याच्या दरावर मर्यादा आल्या.

नजीकच्या काळात, कमकुवत अमेरिकी डॉलर आणि कोव्हिड-१९ साथीचा वाढता प्रभाव यामुळे सोन्याच्या दरांना आधार मिळण्याची शक्यता आहे.


कच्चे तेल: सौदी अरेबियाने पुढील काही महिन्यांत उत्पन्न कपात जाहीर केल्याने डब्ल्यूटीआय क्रूडचे दर १.८४% नी वाढले व ते ५३.२ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. जगातील प्रमुख तेल उत्पादक सौदी अरेबियाने नवीन साथीच्या आजारामुळे सुरू झालेल्या निर्बंधादरम्यान उत्पादन स्थिर ठेवण्यासाठी दररोज १० लाख बॅरल अतिरिक्त उत्पादन कपात करण्याची घोषणा केली. यामुळेही तेलाच्या दरांना काहीसा आधार मिळाला.

ओपेक आणि रशियासह इतर सहकारी संघटना अर्थात ओपेक+ यांनीही येत्या काही महिन्यात उत्पादन स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. याउलट, कोव्हिड-१९ रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये नव्याने निर्बंध लादण्यात आले. यात ब्रिटन, चीन आणि जर्मनीचाही समावेश आहे. यामुळे तेलाच्या दरांबाबत खबरदारी बाळगली जात आहे. अमेरिकेतील वाढती राजकीय अस्थिरता आणि साथीमुळे वाढणारी चिंता यामुळे तेलाचे दर आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे.


बेस मेटल्स: जागतिक मध्यवर्ती बँकांनी साथीचा वाढता प्रभाव आटोक्यात आणण्यासाठी अतिरिक्त प्रोत्साहन पॅकेज जाहीर केल्याने एलएमईवरील बेस मेटलचे दर हिरव्या रंगात स्थिरावले. अध्यक्ष जो बिडेन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेत असल्याने अतिरिक्त प्रोत्साहनाच्या आशा वाढल्या. यामुळे साथीमुळे निर्माण झालेल्या मंदीच्या स्थितीत आर्थिक सुधारणा होण्याची शक्यता आहे.

जगातील सर्वात मोठा औद्योगिक धातूंचा ग्राहक असलेल्या चीनमध्ये कोव्हिड-१९ च्या रुग्णांची चिंताजनक वाढ नोंदली गेली. परिणामी चीनमधील काही भागातील लॉकडाऊनमुळे औद्योगिक धातूंच्या मागणीवर परिणाम झाला. यामुळे बेस मेटलच्या दरात आणखी घट झाली.

फिलिपाइन्स या प्रमुख निकेल उत्पादक देशात पुरवठ्यात अडचणी येत असल्याने निकेलचे दर वाढले. त्यामुळे या देशाने पर्यावरणाच्या चिंतेने तुंबागण बेटावरील खाणकामावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

सोन्याच्या दरात ०.६ टक्क्यांनी वाढ सोन्याच्या दरात ०.६ टक्क्यांनी वाढ Reviewed by News1 Marathi on January 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads