Header AD

भिवंडीत कामतघर ताडाळी रस्त्याची दुरुस्ती संथगतीने सुरू ,नागरीक त्रस्त
भिवंडी ,  प्रतिनिधी  :  भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात कामतघर ताडाळी या निवासी परिसर असलेल्या ठिकाणी संपूर्ण रस्ते हे भुयारी गटर योजनेच्या कामासाठी खोदून ठेवल्याने त्याची दुरवस्था झाली असताना ठेकेदारांव रस्ते पूर्ववत करून देण्याची जबाबदारी असताना त्यांच्या कडून रस्ते दुरुस्ती करण्यात चालढकल केली जात आहे .


मागील एक महिन्या पूर्वी कामतघर ताडाळी या रस्त्याची दुरुस्ती ईगल इन्फ्रास्ट्रक्चर या भुयारी गटर योजनेच्या ठेकेदार कंपनीने सुरू केली त्या साठी या परिसरातील दहा नगरसेवक नारळ वाढवायला हजर झाले परंतु आज ही काही ठिकाणी रस्त्यात फक्त दगड पसरवून ठेवले असल्याने नागरीकांची अवस्था आगीतून फुफाट्यात पाडल्या सारखी झाली आहे .डांबर वेळेवर मिळत नसल्याचे करण दिले जात हवं परंतु रस्त्यावर त्यासाठी आठ आठ दिवस खडी पसरवून ठेवल्याने नागरीकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून कासव गतीने सुरू असलेले काम पूर्ण होणार कधी असा सवाल नागरीक विचारीत आहेत .

भिवंडीत कामतघर ताडाळी रस्त्याची दुरुस्ती संथगतीने सुरू ,नागरीक त्रस्त भिवंडीत कामतघर ताडाळी रस्त्याची दुरुस्ती संथगतीने सुरू ,नागरीक त्रस्त Reviewed by News1 Marathi on January 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads