राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने संविधान सरनामा रॅली
कल्याण , कुणाल म्हात्रे : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश संकल्पनेनुसार प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन संविधान सरनामा रॅली चे आयोजन राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस कल्याण डोंबिवली शहर जिल्हा वतीने आयोजित करण्यातआले होते. रॅलीची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत संविधान सरनामा प्रतिचे सामुहिक वाचन झाले. पुढे ही रॅली रिंगरोड मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पर्यत जात क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुलेंना पुष्पहार अर्पण करुन, डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत संविधानाचे अर्थपुर्ण महत्त्व व पटवून देण्यात आले.
या रॅलीस जिल्हा कार्याध्यक्ष वंडार पाटील, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष प्रसाद महाजन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पदाधिकारी व विधानसभा अध्यक्ष व कार्यकर्ते प्रल्हाद भिलारे, यादगिरे, आदित्य चव्हाण, प्रशांत नगरकर, प्रशांत माळी, प्रथमेश चव्हाण, सौरभ वाघेरे, केतन जगताप,कृनाल पाटील, दिव्येश महाजन, दिपेश चौगुले, रोहन साळवे, कुणाल भंडारी, स्वप्निल शेळके, रोशन उपासे, सुमित सोनके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment